दहिसरमध्ये हिट अँड रन

दहिसरमध्ये हिट अँड रन

Published on

दहिसरमध्ये `हिट ॲण्ड रन’
भरधाव ट्रकच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

मुंबई, ता. २७ : दहिसर येथे पश्चिम द्रुतगती मार्ग ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास भरधाव ट्रकने उडवले. हा अपघात सोमवारी (ता. २६) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातानंतर जखमीला वैद्यकीय मदत न देताच पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रकचालकास पोलिसांनी दहिसर टोल नाक्यावर ताब्यात घेतले. आरोपी ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला; मात्र पुढे टोल नाक्यावर वाहतूक कोंडी असल्याने आरोपी पोलिसांच्या हाती लागला. राजदीप धादल असे ट्रकचालकाचे नाव असून त्याला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले असून अपघात घडला तेव्हा तो दारूच्या नशेत होता का, हे या चाचणीतून स्पष्ट होईल. दरम्यान अपघातात मृत्यू झालेली व्यक्ती ४० ते ५० वयोगटातील असून अद्याप तिची ओळख पटलेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com