निफ्टीची सलग बारावी वाढ

निफ्टीची सलग बारावी वाढ
Published on

निफ्टीची सलग बारावी वाढ
सेन्सेक्सचा ८२ हजारांचा टप्पा कायम
मुंबई, ता. ३० : देशी वित्तसंस्था आणि बड्या वैयक्तिक गुंतवणूकदारांच्या शेअर खरेदीच्या जोरावर आज निफ्टीने सलग बारावी वाढ नोंदवली. सेन्सेक्स २३१.१६ अंश, तर निफ्टी ८३.९५ अंश वाढला.
आजही शेअर बाजारांनी नवे उच्चांक नोंदवले. सुरुवातीला सकाळी शेअर बाजारांनी थोडी घसरण दाखवल्यानंतर त्यांनी दिवसभर नफा दाखवला. आज सेन्सेक्सने ८२ हजारांचा टप्पा कायम राखला, तर निफ्टीदेखील बराच काळ २५ हजार २०० च्या वरच होता. दिवसअखेर सेन्सेक्स ८२,३६५.७७ अंशावर, तर निफ्टी २५,२३५.९० अंशावर स्थिरावला.
आज बांधकाम व्यवसाय, आरोग्य आणि औषधनिर्मिती क्षेत्रे एक टक्का वाढली, तर आयटी आणि वाहननिर्मिती क्षेत्रही वाढले. आयटीसी, मॅरीको, डाबर यांच्या शेअरची विक्री झाल्यामुळे एफएमसीजी निर्देशांक आज घसरला. मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकही अनुक्रमे अर्धा ते पाऊण टक्का वाढले. महिंद्र आणि महिंद्रने भारतासाठी ड्रोन विरोधी संरक्षण तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी सेंट्रिक्सशी करार केल्यामुळे तो शेअर वाढला, तर इथेनॉल उत्पादनासाठी साखर वापरावरील मर्यादा सरकारने उठवल्यामुळे साखर कंपन्यांच्या शेअरकडेही सर्वांचे लक्ष वेधले. जागतिक शेअर बाजार, अमेरिकेच्या व्याजदर कपातीच्या अपेक्षेत आहे, मात्र मजबूत डॉलर, अमेरिकेच्या जीडीपीची चांगली वाढ आणि विक्रीचे चांगले आकडे यामुळे दर कपात कमी असेल, अशीही शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
आज बी.एस.ई.वर टाटा मोटर एक टक्का घसरला, तर रिलायन्स, टेक महिंद्र, आयटीसी हे शेअरही अर्धा टक्का घसरले. दुसरीकडे बजाज फायनान्स दोन टक्का वाढला, महिंद्र आणि महिंद्र, एनटीपीसी, बजाज फिन्सर्व्ह, एअरटेल हे शेअर दीड ते पावणेदोन टक्का वाढले. पॉवरग्रीड, सन फार्मा, टायटन, टीसीएस हे शेअरही एक टक्का वाढले.
........
मुडीजने भारताच्या मानांकनात वाढ केल्यामुळे सर्वत्र उत्साह होता. आता जागतिक आकडेवारीवर लक्ष ठेवत विशिष्ट शेअरच्या आधारे शेअर बाजार आपली चढती कमान कायम राखेल.
-सिद्धार्थ खेमका, मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com