मिडीयासमोर वक्तव्ये, धमकवाल तर खबरदार

मिडीयासमोर वक्तव्ये, धमकवाल तर खबरदार
Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० ः महिला पत्रकाराच्या विनयभंग प्रकरणात माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांना अटकेपासून मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी तात्पुरते संरक्षण दिले आहे. मात्र, या विषयावर मीडियाशी काहीही बोलू नये, साक्षीदारांवर कोणताही प्रभाव टाकू नये किंवा त्यांना धमकावू नये, अशी तंबीदेखील दिली आहे.
बदलापूर घटनेनंतर आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या ‘सकाळ’च्या स्थानिक महिला पत्रकाराला वामन म्हात्रे यांनी अर्वाच्य भाषेत धमकावत विनयभंग केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वामन म्हात्रे यांनी अटकपूर्व जामिनासाठी कल्याण सत्र न्यायालयात धाव घेतली. कल्याण सत्र न्यायालयाने गुरुवारी (ता. २९) त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे अटकेपासून दिलासा मिळावा म्हणून म्हात्रे यांनी अ‍ॅड. विरेश पुरवंत व अ‍ॅड. ऋषिकेश काळे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्या. संदीप मारणे यांच्या एकल पीठासमोर शुक्रवारी (ता. ३०) सुनावणी घेण्यात आली. या वेळी न्यायालयाने पुढील सुनावणीत पीडितेला बाजू मांडण्यासाठी नोटीस बजावताना सुनावणी तहकूब केली.
---------------------------------------
जामीन फेटाळण्याची मागणी
सुनावणी वेळी म्हात्रे यांच्या वकिलांनी बदलापूर, कुळगाव, अंबरनाथच्या विविध प्रश्नांची जाण असलेले नगराध्यक्ष नेहमी पत्रकारांशी संवाद साधत असतात. मात्र, त्यांनी तक्रारदाराशी काहीच आक्षेपार्ह विधान केले नसल्याचा युक्तिवाद केला होता. त्यावर सरकारी वकिलांनी म्हात्रे यांचा दावा फेटाळताना म्हात्रे हे महिला पत्रकाराला पूर्वीपासून ओळखत होते. त्यांना तिची जात माहीत असल्यानेच अर्वाच्च भाषा वापरली, तिला बोलण्यामागे त्यांचा काय उद्देश होता, हे तपासण्यासाठी जामीन देऊ नये, अशी मागणी न्यायालयाकडे केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com