प्रशासकीय अधिकाऱ्याला लाचप्रकरणात अटक

प्रशासकीय अधिकाऱ्याला लाचप्रकरणात अटक
Published on

मुंबई : अकरावी प्रवेशासाठी लाच स्वीकारणाऱ्या घाटकोपर येथील हिंदी विद्याप्रचार समितीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी अटक केली. रवींद्रनाथ सिंह (५६) असे त्याचे नाव आहे.
मुलीच्या अकरावी प्रवेशासाठी तक्रारदाराने ऑनलाइन अर्ज भरला होता. त्यात घाटकोपर येथील झुनझुनवाला महाविद्यालयासह अन्य पाच ते सहा महाविद्यालयांची नावेही दिली होती. झुनझुनवाला महाविद्यालयाच्या पहिल्या दोन याद्यांमध्ये मुलीचे नाव नसल्याने तक्रारदाराने आरोपीची भेट घेतली. अन्य एक यादी प्रसिद्ध होणार असल्याचे आरोपीने सांगितले. दरम्यान, तक्रारदाराने विधान परिषद सदस्य, आमदार राजहंस सिंह यांच्या शिफारस पत्रासह आरोपीची भेट घेतली. तेव्हा त्याने दीड लाखांची लाच मागितली. तडजोडीअंती ५० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com