

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : लालबहादूर शास्त्री मार्गावर गांधीनगरजवळ बेस्टच्या सीएनजी बसला आग लागल्याची घटना सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. यात बस जळून खाक झाली आहे. काही मिनिटांपूर्वीच या बसमधील प्रवासी उतरले असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. बेस्ट प्रशासनाकडून या आगीच्या घटनेची चौकशी सुरू आहे. यात बसचालक किरकोळ जखमी झाले आहेत.
धारावी आगारातील वांद्रे पूर्व ते मुलुंड पश्चिम मार्गावर धावणारी ही बस क्रमांक ३०३ ही बस आज गांधीनगरपर्यंत चालवण्यात येत होती. प्रवाशांना उतरवून ती यूटर्न घेत असताना तिच्या बोनेटमधून धूर येत असल्याचे चालक संजय सूर्यवंशी यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ बस रस्त्याच्या बाजूला थांबवताच आगीने रौद्ररूप धारण केले. क्षणार्धात संपूर्ण बस भस्मसात झाली. काही वेळाने पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. यात बसवाहक अजित सराटे हे किरकोळ होरपळले. ही बस मातेश्वरी या कंत्राटदाराकडून चालवण्यात येत होती. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून बेस्ट प्रशासनाकडून चौकशी सुरू आहे. यापूर्वीही चालत्या बसला आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत, त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.