

मुंबईत आढळला झिकाचा रुग्ण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : मुंबईतील दादर येथे झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ८७ वर्षीय व्यक्तीमध्ये झिका संसर्गाचे निदान झाले आहे. या आजाराची लक्षणे असलेल्या वृद्ध व्यक्तीच्या रक्ताचे नमुने पुष्टीकरणासाठी पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी लॅबमध्ये पाठवण्यात आले. अहवालात या आजाराचे निदान झाले आहे. वृद्ध त्यांच्या आजारातून बरे झाले आहेत की नाही, ते बाधित भागातून आले आहेत की नाही, याबद्दल कोणतीही माहिती पालिका आरोग्य विभागाकडून मिळालेली नाही. याप्रकरणी पालिका आरोग्य विभाग मौन बाळगून आहे. याबाबत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती नसल्याचे सांगितले. राज्यात या वर्षी झिका विषाणूची लागण झालेल्यांची संख्या १३०वर पोहोचली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.