मैदान, मोकळे भूखंड करणार विकसित

मैदान, मोकळे भूखंड करणार विकसित
Published on

मैदान, मोकळे भूखंड करणार विकसित
पालिकेच्या उद्यान विभागाचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : मुंबई महापालिकेने मैदान व मोकळे भूखंड विकसित करायला सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात दहिसर आणि बोरिवलीतील मैदान विकसित केले जात आहे. याशिवाय एक्सर व्हीलेज मैदान विकसित केले जाणार आहे. यानंतर टप्प्याटप्प्याने इतर मैदाने विकसित केली जाणार आहेत.
आर/उत्तर विभागातील दहिसर (पूर्व) येथील युनिव्हर्सल स्कूलसमोरील भूखंडावरील मैदान विकसित करणे आणि आर/उत्तर विभागातील बोरिवली (पश्चिम) येथील कल्पना चावला मार्गवरील नारायण स्कूलजवळील भूखंड क्रमांक १२५७सी/५ व १२५७सी, एक्सर व्हीलेज मैदान विकसित केले जाणार आहे. उद्यान विभागाने हा निर्णय घेतला आहे.
मुख्य प्रवेशद्वाराची दुरुस्ती करणे, नवीन सुरक्षा चौकी बांधणे, संरक्षक भिंतीची दुरुस्ती करून रंगरंगोटी करणे, पदपथाचे बांधकाम करणे, मल्टीपरपज कोर्ट उभारणे व बैठक व्यवस्था, खेळाची साधने बसवणे, गजीबो बांधणे, व्यायामाची साधणे बसवणे, विद्युतीकरणाची कामे, हिरवळीची कामे आदींचा त्यात समावेश आहे, तसेच आर/उत्तर विभागातील बोरिवली पश्चिमेतील कल्पना चावला मार्गावरील नारायण स्कूलजवळील एक्सर व्हीलेज मैदान विकसित केले जाणार आहे.

पाच कोटींचा खर्च
ही कामे करण्यासाठी पालिकेने निविदा प्रक्रिया सुरू करून अर्ज मागवले. त्याला मे. बी. व्ही. एंटरप्रायज, मे. आर. एस. कंस्ट्रक्शन, मे. विकाश एंटरप्रायजेस, मे. हर्षिल एंटरप्रायजेस, मे. महाकाली एंटरप्रायजेस, मे. मानसी कंस्ट्रक्शन, मे. समृद्धी एंटरप्रायजेस या कंपन्यांनी प्रतिसाद दिला. यातील मे. बी. व्ही. एंटरप्रायज हे प्रथम लघुत्तम प्रतिसादात्मक निविदाकार ठरले आहेत. त्यांना हे काम देण्यात आले आहे. कंत्राटदार कंपनीला ११ महिन्यांमध्ये हे काम करावे लागणार आहे. पालिका यावर चार कोटी ९७ लाख ५७ हजार ४७३ कोटी रुपये खर्च करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com