‘एचआयव्ही’ग्रस्त ज्येष्ठांच्या ‘उमेद मेळाव्या’ला प्रतिसाद

‘एचआयव्ही’ग्रस्त ज्येष्ठांच्या 
‘उमेद मेळाव्या’ला प्रतिसाद
Published on

‘एचआयव्ही’ग्रस्त ज्येष्ठांच्या
‘उमेद मेळाव्या’ला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त मुंबई महापालिका क्षेत्रातील ‘एचआयव्ही’ग्रस्त ज्येष्ठ नागरिकांसाठी नुकतेच ‘उमेद मेळाव्या’चे आयोजन केले होते. मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेच्या वतीने आयोजित या मेळाव्याला ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी संस्थेचे अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. विजयकुमार करंजकर व उपसंचालिका ज्ञानेश्वरी सोनावणे यांनी मार्गदर्शन केले. ‘उमेद मेळाव्या’च्या निमित्ताने आरोग्य तपासणी शिबिरात रक्तदाब, मधुमेह, हाडांची तपासणी, डोळे तपासणी आदी वैद्यकीय सुविधांचा लाभ ज्येष्ठांनी घेतला. तसेच, त्यांना पंतप्रधान जनआरोग्य योजना व आभा कार्डचा लाभ मिळवून देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com