कोल्ड प्ले तिकिटांच्या काळाबाजारप्रकरणी गुन्हा

कोल्ड प्ले तिकिटांच्या 
काळाबाजारप्रकरणी गुन्हा
Published on

मुंबई, ता. ३ : जगप्रसिद्ध ब्रिटिश रॉक बँड ‘कोल्ड प्ले’च्या मैफलीच्या तिकिटांच्या काळाबाजारप्रकरणी विलेपार्ले पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई बुक माय शो कंपनीने दिलेल्या तक्रारीआधारे करण्यात आली आहे.
बिग ट्री एन्टरटेन्मेंट कंपनीच्या बुक माय शो या ऑनलाइन पोर्टलकडे कोल्ड प्ले मैफलीच्या तिकीटविक्रीची अधिकृत जबाबदारी होती. ही मैफल जानेवारीत १८, १९ आणि २१ रोजी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगणार आहे. बुक माय शोच्या व्यवस्थापक (कायदा) पूजा मित्रा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २२ सप्टेंबरला दुपारी १२ वाजल्यापासून (बुक माय शो) संकेतस्थळ आणि ॲपद्वारे तिकिटे विक्रीस सुरुवात केली. ग्राहकांना प्रत्यक्ष तिकीट न देता आधी त्यांच्या नावे बुकिंग आयडी जारी केली जाणार होती. त्याआधारे तिकीट दिले जाणार होते. तसेच, एका व्यवहारकर्त्यास फक्त चार तिकिटे दिली जाणार होती.

ही प्रक्रिया आटोपल्यानंतर अर्जुन सिंग या व्यक्तीने ई-मेलद्वारे काही व्यक्ती व्हॉट्सॲप, इन्स्टाग्रामसह विगोगो संकेतस्थळावर मैफलीची तिकिटे चढ्या भावात विकत असल्याची तक्रार केली. चौकशीत २७ व्यक्ती आणि दोन संकेतस्थळांवर बनावट आणि चढ्या भावातील तिकिटे विक्रीस उपलब्ध होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com