

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : मध्य रेल्वेच्या कसारा रेल्वे स्थानकात गुरुवारी दुपारी पॉइंट फेलची घटना घडली. त्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा वाजले. त्याचा परिणाम थेट उपनगरी लोकल सेवांवर दिसून आला. त्यामुळे दुपारी रेल्वे प्रवाशांचे हाल झाले.
मध्य रेल्वेच्या कसारा रेल्वे स्थानकाजवळ डाऊन मार्गावरील पॉइंटच्या यंत्रणेत बिघाड झाला होता. त्यामुळे गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास झाल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. परिणामी, लोकलच्या एका मागोमाग एक रेल्वे गाड्यांच्या रांगा लागल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला होता. त्यामुळे लोकल गाड्यांमध्ये प्रवासी अडकून पडले होते. या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेचे अभियांत्रिकी पथक घटनास्थळी दाखल झाले. पॉइंटमधील बिघाड दुरुस्त करण्यात आला. त्यानंतर रेल्वे वाहतूक पूर्ववत केली. या घटनेमुळे उपनगरी लोकल वाहतुकीवर परिणाम दिसून आला. दुपारी अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना लोकल गर्दीचा समना करावा लागला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.