जन्मदात्या पित्याकडून पाच वर्षे अत्याचार

जन्मदात्या पित्याकडून 
पाच वर्षे अत्याचार
Published on

जन्मदात्या पित्याकडून
पाच वर्षे अत्याचार
बेपत्ता अल्पवयीन मुलगी सापडल्यानंतर फुटली वाचा
मुंबई, ता. ३ : बेपत्ता अल्पवयीन मुलीला सुखरूप ताब्यात घेतल्यानंतर तिने सांगितलेल्या कहाणीने मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारीही स्तंभित झाले. तब्बल पाच वर्षांपासून जन्मदात्या पित्याकडून लैंगिक शोषण सुरू असल्याने घर सोडल्याचे तिने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी लगोलग गुन्हा नोंदवत अत्याचारी पित्याला अटक केली.

दक्षिण मुंबईत पालकांसोबत राहणारी १७ वर्षांची मुलगी मंगळवारी बेपत्ता झाली. पित्याने तशी तक्रार पोलिस ठाण्यात केली. मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांसह गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. गुन्हे शखेचे प्रभारी पोलिस निरीक्षक सदानंद येरेकर यांच्या मार्गदर्शनाखालील समीर मुजावर, राणे, गोरेगावकर, अंमलदार घाटकर, परब, जगताप, चव्हाण, ठाकूर, हर्षला पाटील या पथकाने मुलीला दक्षिण मुंबईतील एका रेल्वे स्थानकातून सुखरूप ताब्यात घेतले.

कक्ष कार्यालयात आणून केलेल्या चौकशीत २०१९ ते घर सोडेपर्यंत पित्याचे लैंगिक अत्याचार सुरू होते. याबद्दल आई किंवा अन्य कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी पित्याने दिली होती. हे अत्याचार सहन होत नसल्याने घर सोडले, अशी माहिती या मुलीने दिली. धीर देत समुपदेशन करून पथकाने तिला ताडदेव पोलिस ठाण्यात आणले. तेथे तिच्या तक्रारीवरून पोक्सोनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आणि पित्याला अटक करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com