

‘कोल्ड प्ले’च्या तिकिटाच्या प्रलोभनाने फसवणूक
चुनाभट्टी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद
मुंबई, ता. ४ : ‘कोल्ड प्ले’ या शोच्या तिकिटांआडून सायबर भामट्यांनी अनेकांची फसवणूक सुरू केली आहे. चुनाभट्टी येथे राहणारा तरुण आणि त्याच्या मित्रपरिवाराने दोन लाखांत ही तिकिटे मिळवली; मात्र ही तिकिटे बनावट निघाली. याप्रकरणी गुरुवारी (ता. ३) अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
चुनाभट्टी येथे राहणाऱ्या वीरेंद्र जैन (वय १८) या विद्यार्थ्याने २४ सप्टेंबरला गुगलद्वारे ‘कोल्ड प्ले’ या शोची तिकिटे उपलब्ध आहेत का, याचा शोध घेतला. शोधमोहीम सुरू असताना त्याने एका मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. यावेळी समोरील व्यक्तीने साडेसात आणि दहा हजार किमतीची तिकिटे उपलब्ध असल्याचे सांगितले. तसेच, निम्मी रक्कम सांगितलेल्या खात्यावर पाठवल्यावर तिकिटे ई-मेलद्वारे पाठवण्यात येतील. त्यानंतर उर्वरित रक्कम स्वीकारली जाईल, असे या व्यक्तीने सांगितले. वीरेंद्र याने ही माहिती आपल्या मित्रपरिवार आणि परिचित व्यक्तींना दिली. या साऱ्यांनी मिळून दोन लाख १७ हजार ५०० रुपये विविध खात्यांवर ऑनलाइन अदा केले. त्यानुसार या सर्वांना तिकिटे प्राप्त झाली; मात्र ती तिकिटे आणि ई-मेल आयडी बनावट असल्याचे लक्षात येताच वीरेंद्र व त्याच्या मित्र परिवाराने पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केल्याचे चुनाभट्टी पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.