कंगनाच्या इमर्जन्सी चित्रपटाला दोन आठवड्यांत प्रमाणपत्र

कंगनाच्या इमर्जन्सी चित्रपटाला दोन आठवड्यांत प्रमाणपत्र
Published on

कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाला दोन आठवड्यांत प्रमाणपत्र

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : कंगना राणावतच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाला दोन आठवड्यांत प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे. सेन्सॉर बोर्डाने मजकूर हटवण्याबाबत सांगितलेले बदल मान्य करण्यात आले असून या बदलांची सेन्सॉर बोर्ड पडताळणी करेल व त्यानंतर प्रमाणपत्र देईल, अशी माहिती झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेसने आज मुंबई उच्च न्यायालयात दिली.
‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी प्रमाणपत्राची भौतिक प्रत सेन्सॉर बोर्डाकडून (सीबीएफसी) मिळावी, यासाठी झी एंटरटेनमेंटने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज (ता. ४) बी. पी. कोलाबावाला आणि न्या. फिरदोश पूनिवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. झी एंटरटेनमेंटच्या वतीने बाजू मांडताना गेल्या सुनावणीवेळी ॲड. शरण जगतियानी यांनी उच्च न्यायालयात सांगितले की, सीबीएफसीने कंगना यांना सुधारित बदलांबद्दल माहिती दिली आहे. कंगना आणि सेन्सॉर बोर्ड यांच्यात या विषयावर चर्चा झाली आहे, तसेच सहमतीदेखील झाली आहे. तथापि, झी एंटरटेनमेंटला दृश्ये वगळण्यासाठी वेळ लागेल. दृश्ये हटवण्यात आल्यानंतर त्याचा परिणाम चित्रपटाच्या वेळेवर होणार नाही, याचीदेखील काळजी घेतली जाईल. आज झालेल्या सुनावणीवेळी ॲड. जगतीयानी यांनी सांगितले की, सेन्सॉर बोर्डाने बदल सुचवले होते, त्यानुसार बदल करण्यात येणार असून चित्रपटाला यूए प्रमाणपत्र दिले जाणार आहे. न्यायालयाने हा युक्तिवाद ऐकून घेत याचिका निकाली काढली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com