शहरातील तीन अवैध कॉल सेंटरवर छापे; ३६ आरोपींना अटक
शहरातील तीन अवैध कॉल सेंटरवर छापे; ३६ आरोपींना अटक
मुंबई, ता. ४ : गुन्हे शाखेने शहरात सुरू असलेली तीन अवैध कॉल सेंटर उद्ध्वस्त करत एकूण ३६ आरोपींना अटक केली. यातील दोन कॉल सेंटरद्वारे भारतात प्रतिबंधित असलेल्या औषधांची परदेशी नागरिकांना ऑनलाइन विक्री सुरू होती, तर तिसरे सेंटर ‘सीबील’ गुणांकन वाईट असेल तरीही कर्ज मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत गरजूंना फसवत होते.
आरे वसाहतीत रॉयल पामस् परिसरात धन सुविधा फायनान्स नावाने सुरू झालेल्या अवैध अर्थपुरवठा करणाऱ्या कंपनीबाबत गुन्हे शाखेच्या कक्ष १२तील अधिकाऱ्यांना मिळाली. सखोल चौकशी केल्यावर या कंपनीने कॉल सेंटरद्वारे सीबील खराब असलेल्या व्यक्तींना वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली प्रोसेसिंग फी घेऊन अनेक व्यक्तींची फसवणूक केल्याची माहिती पुढे आली. त्या आधारे या कंपनीवर धाड घालून मालकासह एकूण २४ आरोपींना अटक केली. यात आठ महिलांचा समावेश आहे. अन्य कारवाईत जोगेश्वरीच्या बेहराम बाग परिसरात सुरू असलेल्या दोन अवैध कॉल सेंटरवर कक्ष १० च्या अधिकाऱ्यांनी छापा घातला. तेथे परदेशातील व्यक्तींशी इंटरनेटद्वारे संपर्क साधून व्हायग्रा, ट्रामाडोलसह अन्य प्रतिबंधित औषधांची विक्री ऑनलाइन सुरू होती. हे व्यवहार विदेशी चलनातून सुरू होते. छापा कारवाईत या दोन्ही कॉल सेंटरमधून १२ आरोपींना अटक केली, तसेच मोबाईल, लॅपटॉपसह अन्य वस्तू हस्तगत करण्यात आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

