संविधान बदलणाऱ्यांचा
कोथळा काढू : आठवले

संविधान बदलणाऱ्यांचा कोथळा काढू : आठवले

Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : ‘देशाचे संविधान कोणीही बदलू शकत नाही; मात्र कोणी तसा विचार करत असेल तर त्यांचा कोथळा काढू’, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्‍ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला. ‘आगामी विधानसभेच्या निवडणुकीत मिळतील त्या जागांवर लढणार आहोत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागावे आणि राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणावे,’ असे आवाहनही त्यांनी केले.
सातारा येथे तालीम संघ मैदानावर रिपब्लिकन पक्षाच्या ६७व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात आठवले बोलत होते. आठवले म्हणाले, ‘रिपब्लिकन पक्ष छोटा पक्ष असला तरी मोठ्या पक्षांना सत्ता मिळवून देण्यात मोठी मदत करणारा पक्ष आहे. या पक्षाला वाढवायचे आहे.’
‘काँग्रेसचे राहुल गांधी यांनी संविधान बदलणार म्हणून चर्चा घडवून आणली असली तरी संविधान बदलणे शक्य नाही. तरीही आमच्या पायावर कोणी पाय देत असेल तर काय करायचे ते ठरवू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला पेटवायला नाही तर विझवायला शिकवले आहे. आम्ही हिंसा नाही, तर अहिंसा मानतो,’ असेही आठवले म्हणाले.
मेळाव्‍याला माजी मंत्री अविनाश महातेकर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, सीमा आठवले, जीत आठवले, गौतम सोनवणे, सिद्धार्थ कासारे, चंद्रकांता सोनकांबळे, शीला गांगुर्डे, मेळाव्याचे संयोजक अशोक गायकवाड, सूर्यकांत वाघमारे, स्वप्नील गायकवाड, अण्णा वायदंडे, रमेश मकासरे, विजय वाकचौरे, सुरेश बार्शिंग, श्रीकांत भालेराव, बाळाराम गायकवाड, प्रकाश लोंढे, विजय आगलावे, दयाळ बहादूर, अनिल गांगुर्डे यांच्यासह राज्यभरातील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी अशोक गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com