खासदार हंडोरेंच्या मुलाला अटक

खासदार हंडोरेंच्या मुलाला अटक
Published on

मुंबई, ता. ५ : राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांचा मुलगा गणेश हंडोरे यांना गोवंडी पोलिसांनी शनिवारी सकाळी हिट ॲण्ड रन प्रकरणात अटक केली आहे. शुक्रवारी रात्री गणेश यांच्या भरधाव कारने चेंबूरच्या आचार्य महाविद्यालयाजवळ एका दुचाकीस्वाराला धडक दिली. अपघातानंतर जखमी दुचाकीस्वारास वैद्यकीय मदत न देताच गणेश हे तेथून पसार झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

जखमी तरुणास स्थानिक रहिवाशांनी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती स्थिर आहे. स्थानिकांनी दिलेली माहिती आणि सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे पोलिसांनी गणेश यांचा माग काढला. अपघात घडला तेव्हा ते दारूच्या नशेत नव्हते, असे पोलिसांनी म्हटले आहे. निष्काळजीपणे वाहन चालवून स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घातल्याचा गुन्हा त्यांच्यावर नोंदवण्यात आल्याचे गोवंडी पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com