आर्थिक गुन्हे शाखेचा अधिकारी गजाआड
मुंबई, ता. ९ : फसवणूक प्रकरणात तक्रारदाराचा जबाब नोंदवण्यासाठी पाच लाखांची लाच मागणाऱ्या पोलिस निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहाथ अटक केली. मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या कक्ष आठ (एमपीआयडी) येथे नियुक्त होते.
तमिळनाडू येथील तक्रारदाराने ब्लीस कन्सल्टन्सी कंपनीत ४९ लाख गुंतवले होते; मात्र कंपनीने गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याने आर्थिक गुन्हे शाखेत याप्रकरणी गुन्हा नोंद होता. या गुन्ह्याच्या तपासावेळी जबाब नोंदवण्यासाठी फसवणुकीच्या रकमेच्या दहा टक्के म्हणजे चार लाख ९० हजारांची लाच सावर्डेकर यांनी मागितली. त्यामुळे तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

