सामूहिक बलात्काराची तक्रार

सामूहिक बलात्काराची तक्रार

Published on

सामूहिक बलात्काराची तक्रार
एक आरोपी अटकेत
मुंबई, ता. ९ ः परराज्यातून मुंबईत आलेल्या १८ वर्षीय तरुणीला गुंगीकारक द्रव्य पाजत दोन व्यक्तींनी बलात्कार केल्याची तक्रार निर्मल नगर पोलिस ठाण्यात पीडितेने केली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा मंगळवार (ता. ८) नोंद केला आहे; मात्र तक्रारदार चुकीची माहिती देत असल्याचा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित ३१ वर्षीय तरुणास अटक केली आहे.
पीडित मूळची उत्तरप्रदेशची असून महिन्याभरापूर्वी पश्चिम उपनगरात राहणाऱ्या चुलत्याकडे आली होती. चुलत्याने मालमत्तेची संबंधित कागदपत्रांवर तिच्या जबरदस्तीने सह्या घेतल्या. त्यावरून दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर मुंबई सफरीवर नेण्याच्या निमित्ताने तिला नातेवाइकांनी लोकल ट्रेनमध्ये बसवून पळ काढला. पीडिता वांद्रे परिसरात भटकत असताना दोन तरुण कारने आले, तिला चुलत्याकडे नेतो, असे सांगून गाडीत बसवले. त्यांनी दिलेले पाणी प्यायल्यावर पीडितेने गुंगी आली. त्यांनी एका पडीक इमारतीत नेत तिच्यावर बलात्कार केला, असे पीडितेने तक्रार म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com