

प्राणघातक हल्ला करणाऱ्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : रेल्वेत मांस वाहून नेल्याच्या संशयावरून ७१ वर्षीय मुस्लिम व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आकाश राजेंद्र आव्हाडचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच फेटाळला.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, २८ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास धुळे-सीएसएमटी रेल्वेतून कल्याण स्थानकात उतरत असतानाच मांस वाहून नेत असल्याच्या संशयावरून ७१ वर्षीय वृद्धावर आकाश आव्हाड याच्यासह पाच ते सहा अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अटक पूर्व जामीन मिळावा यासाठी आकाश आव्हाड याने अर्ज केला. त्यावर न्या. आर.एन. लड्ढा यांच्या एकलपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. आपण मारहाण केली नसल्याचा युक्तिवाद आव्हाड यांनी केला तसेच पोलिसांनी आपल्याला खोट्या प्रकरणात अटक केल्याचा दावा केला. इतकेच काय तर एफआयआर दाखल करण्यात दोन दिवसांचा विलंब केल्याचे त्याने न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने मात्र पोलिसांचा युक्तिवाद ग्राह्य धरत आव्हाड याचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.