मुलुंडमध्ये निवडणुकीची औपचारिकता

मुलुंडमध्ये निवडणुकीची औपचारिकता

Published on

मुलुंडमध्ये निवडणुकीची औपचारिकता
तुल्यबळ उमेदवार नसल्याने लढत एकतर्फी
जयेश शिरसाट ः सकाळ वृत्तसेवा
प्रतिस्पर्धी पक्षांनी तुल्यबळ उमेदवार न दिल्याने मुलुंड मतदारसंघातील निवडणूक निव्वळ औपचारिकता ठरते आहे. येथील एकतर्फी पर्यायाने नीरस लढत एकूण मतदान किती होते आणि भाजपचे मताधिक्‍य वाढते की घटते एवढ्यापुरतीच मर्यादित आहे.
लोकसभेत पराभव झाल्यानंतरही भाजपने विद्यमान आमदार मिहीर कोटेचा यांना विधानसभेची उमेदवारी देऊ केली आहे. येथे मराठी मतदारांचा टक्का सर्वाधिक असल्याने मनसे उमेदवार देईल, अशी अपेक्षा होती; मात्र मनसेने उमेदवार न देता येथून लढतीआधीच माघार घेतली. जागावाटपावरून भांडणाऱ्या महाविकास आघाडीतील एकही पक्ष येथून लढण्यास राजी होत नव्हता. अखेर काँग्रेसने राकेश शेट्टी या अत्यंत नवख्या चेहऱ्यास येथून उमेदवारी दिली.
२०१७च्या महापालिका निवडणुकीत येथील सर्व जागा भाजपने जिंकल्या होत्या. १९९० पासून येथे सलग भाजपचा आमदार आहे. अलीकडच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराने येथून ६० हजार मतांची आघाडी घेतली होती. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी येथून तुल्यबळ उमेदवार देईल, अशी अपेक्षा मतदारांना होती; मात्र ती फोल ठरली. त्यामुळे उमेदवार नसल्याने मनसेची पारंपरिक मते कोणाला पडतात, शिवसेना ठाकरे गट काँग्रेसच्या नवख्या उमेदवाराला किती मदत करतो, याबाबत मतदारसंघात उत्सुकता आहे.

भाषिक समीकरण
मुलुंडमध्ये १.२८ लाख मराठी, ५३ हजार गुजराती, ३३ हजार उत्तर भारतीय, १४ हजार दाक्षिणात्य, पाच हजार उर्दू भाषिक मतदार आहेत.

लोकसभा लढतीतले चित्र
महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांना मुलुंडमधून १,१६,४२१ तर महाविकास आघाडीचे संजय पाटील यांना ५५,९७९ मते पडली होती.

मागील विधानसभा लढती
२०१९
मिहीर कोटेचा, भाजप - ८७,२५३
हर्षला चव्हाण, मनसे - २९,९०५
गोविंद सिंह, काँग्रेस - २३,८५४

२०१४
सरदार तारासिंग, भाजप - ९३,८५०
चरणसिंग सप्रा, काँग्रेस - २८,५४३
प्रभाकर शिंदे, शिवसेना - २६,२५९
सत्यवान दळवी, मनसे - १३,४३२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com