भारतातील तरुणींमध्ये वाढतोय प्रगत अवस्थेतील स्तनाचा कर्करोग

भारतातील तरुणींमध्ये वाढतोय प्रगत अवस्थेतील स्तनाचा कर्करोग

Published on

भारतातील तरुणींमध्ये वाढतोय प्रगत अवस्थेतील स्तनाचा कर्करोग
ब्रेस्ट कॅन्सर जनजागृतीसाठी पदयात्रा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : भारतातील तरुण महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. याबाबच्या जागरूकतेसाठी पवईतील डॉ. एल. एच. हिरानंदानी रुग्णालयाने नुकतीच ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस वॉकचे आयोजन केले होते. यात एक हजारांहून अधिक तरुण-तरुणी सहभागी झाले होते. यासोबत या पदयात्रेमुळे परिसरातदेखील जागरूकता पसरवण्यात आली. यात स्तनाचा कर्करोग प्रतिबंध, लवकर ओळख आणि उपचाराच्या पर्यायांबद्दलची माहिती देण्यात आली.
पदयात्रेसोबत एक छोटे नाटक सादर करण्यात आले, त्यात कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमुळे स्त्रिया आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात, अशा प्रकारचे सादरीकरण करण्यात आले. या दुर्लक्षात अनेकदा स्तनाच्या कर्करोगाच्या सुरुवातीची लक्षणे असतात.
भारतातील महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग हा सर्वाधिक प्रमाणात वाढत आहे. २६ पैकी एका महिलेला कर्करोगाचा धोका असतो, तर कर्करोग झालेल्या महिलांकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे समोर आले आहे. स्तनाचा कर्करोग पूर्वीपेक्षा जास्त तरुण स्त्रियांना प्रभावित करत आहे, लवकर ओळख आणि नियमित तपासणीची गरज असल्याचे समोर आले आहे.
डॉ. एल. एच. हिरानंदानी रुग्णालयाचे सीईओ डॉ. समीर कुलकर्णी यांनी लवकरात लवकर स्तन कर्करोगाचे निदान करावे, असा सल्ला दिला आहे. वार्षिक मेमोग्राम आणि नियमित स्तन तपासणी, हे उशिरा झाल्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे स्तनाच्या कर्करोगाची लवकर तपासणी करणे गरजेचे आहे.
ब्रेस्ट ऑन्को सर्जन डॉ. नमिता पांडे यांनी स्व-तपासणी संतुलित आहार, नियमित व्यायाम, तणाव व्यवस्थापन आणि पुरेशी झोप या गोष्टीदेखील महत्त्वाच्या असतात. डॉ. एल. एच. हिरानंदानी रुग्णालयाचे सीईओ डॉ. समीर कुलकर्णी यांनी लवकरात लवकर स्तन कर्करोगाचे निदान करावे. असा सल्ला दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com