मनसेचे इंजित धावेल का?

मनसेचे इंजित धावेल का?

Published on

मनसेचे इंजिन धावेल का?
अणुशक्‍तीमध्ये १५ वर्षांत मतांची घसरण
नितीन जगताप ः सकाळ  वृत्तसेवा 
मुंबई, ता. १७  : अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात गेल्या १५ वर्षांचा मागोवा घेतल्यास मनसेच्या मतांमध्ये घसरण झाल्याचेच दिसून येते. मराठीचा मुद्दा ते हिदुत्व अशी मनसेने भूमिका बदलली आहे. त्यामुळे घसरलेला मतांचा आलेख वाढून  आता तरी मनसेचे इंजिन धावेल का, असा प्रश्न मतदारांना पडला आहे, तसेच येथील मनसेच्या सभांनाही कमी गर्दी होत आहे.
  २००९ मध्ये मनसेची राज्यात विशेषतः मुंबई महानगरात  चांगली हवा होती.  मनसेच्या मराठी माणसाच्या आंदोलनामुळे   तरुणवर्ग मनसेकडे वळला होता. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत  नबाब मलिक यांनी तुकाराम काते यांचा सहा हजार ८२५ मतांनी पराभव केला होता, परंतु त्याचवेळी मनसेच्या उमेदवाराने  १६ हजार ७३७ मते घेतली होती. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर पहिली विधानसभा निवडणूक होती. या निवडणुकीत आघाडीच्या अनेक उमेदवारांना फायदा झाला, तर युतीच्या उमेदवारांचे नुकसान झाले होते.
२०१४ मध्ये  आघाडी सरकारच्या विरोधात वातावरण होते. केंद्रात  बहुमताने भाजप युतीचे सरकार आले होते.  सर्व पक्ष युती आघाडी न करता लढले. यामध्ये आघाडीच्या विरोधात असलेल्या वातावरणाचा तुकाराम काते यांना फायदा झाला. त्यांनी नवाब मलिक यांचा १,००७ मतांनी पराभव केला होता, परंतु मनसेच्या उमेदवाराला ५,८७९ मते मिळाली होती, तर २०१९  मध्ये तुकाराम काते यांच्याबाबत नाराजी होती. त्याचा फायदा घेत नवाब मलिक यांनी १२,७५१ मतांनी विजय मिळवला. त्या वेळी मनसेला  ३,२८२ मते  मिळाली होती. 
अणुशक्‍ती विधानसभा मतदारसंघात मनसेकडून नवीन आचार्य, राष्‍ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) फाहद अहमद, बहुजन समाज पार्टीचे महेंद्र भिंगारदिवे, राष्‍ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) सना मलिक, वंचित बहुजन आघाडीचे सतीश राजगुरू असे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
मनसेला २००९ मध्ये  १६,७८७ मते मिळाली होती, ती २०१९ मध्ये ३,२८२ पर्यंत पाचपटीने खाली आली आहेत. असे असले तरी आता भाजप-शिवसेना युतीचा येथे उमेदवार नाही. त्याचा फायदा होऊ शकतो का, हे निकालानंतरच स्‍पष्‍ट होईल. राज ठाकरे यांनी सभा जरी घेतली असली तरी त्यांच्या सभेला फारशी गर्दी नव्हती. मतपेटीतील आकडे वाढवण्यासाठी मनसेला अधिक जोमाने प्रचार करावा लागणार आहे. 
===
विधानसभा २०१९ 
नवाब मलिक  राष्ट्रवादी - ६५,२१७
तुकाराम काते शिवसेना  - ५२,४६६
विना उकरंडे मनसे - ३,२८२

विधानसभा २०१४ 
तुकाराम काते शिवसेना - ३९,९६६
नवाब मलिक राष्ट्रवादी - ३८,९५९
विजय रावराणे मनसे  - ५,८७९

विधानसभा २००९
नवाब मलिक  राष्ट्रवादी - ३८,९३८
तुकाराम काते शिवसेना  - ३२,१०३
विना उकरंडे मनसे - १६,७८७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com