मिरा रोड, विरारमध्ये 
घरांच्या विक्रीत वाढ

मिरा रोड, विरारमध्ये घरांच्या विक्रीत वाढ

Published on

मिरा रोड, विरारमध्ये
घरांच्या विक्रीत वाढ

नाइट फ्रॅंकचा अहवाल

मुंबई, ता. १७ : पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने ठाणे, डोंबिवलीमागोमाग विरार, मिरा रोड येथे निवासी मालमत्तांच्या व्यवहारात वाढ होत असल्याचे नाइट फ्रॅंक संस्थेच्या अहवालातून समोर आले आहे.

नुकत्याच संपलेल्या तिमाहीत विरारमध्येच ६०,७१९ घरे विकली गेली. या व्यवहारांचे मूल्य ५४ हजार २३९ कोटी रुपये होते, असे या अहवालात म्हटले आहे. १२६ किलोमीटर लांबीच्या विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉरचे काम सुरू आहे. हा प्रकल्प विरारला, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गाशी जोडणारा आहे. यामुळे वाहतूककोंडी कमी होईल. प्रवासाचा वेळ वाचेल आणि औद्योगिक विकासाला चालना मिळून रोजगार संधी वाढेल. तसेच, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामुळेही विरारच्या बांधकाम व्यवसायावर चांगला परिणाम होईल, असेही सांगितले जात आहे. उत्तन-विरार सी लिंक, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर या प्रकल्पांमुळे विरारची कनेक्टिव्हिटी वाढून घरांच्या मागणीला चालना मिळेल, असे जॉयविले शापूरजी हाऊसिंगचे व्यवस्थापकीय संचालक श्रीराम महादेवन म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com