विधानसभेत आतापर्यंत 
४६१ महिला आमदार

विधानसभेत आतापर्यंत ४६१ महिला आमदार

Published on

विधानसभेत आतापर्यंत
४६१ महिला आमदार

पहिल्या विधानसभेत सर्वाधिक ३० महिलांना संधी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : महाराष्‍ट्राची ओळख पुरोगामी राज्य म्हणून केली जाते; मात्र विधानसभेत महिलांना संधी देण्याबाबत या राज्याचे मागासलेपणच दिसून येते. १९५७ ते १९६२ अशा ६७ वर्षांच्या प्रदीर्घ काळात या सभागृहात केवळ ४६१ महिलाच पोहोचू शकल्या आहेत. जवळपास निम्मी लोकसंख्या असलेल्या या घटकाची ही आकडेवारी नक्कीच समाधानकारक नसल्याचे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून दिसते.

देशात पुरुषांबरोबरीनेच महिलांना मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला आहे. त्या वेळी अनेक देशांतील महिलांना हा अधिकार मिळवण्यासाठी प्रदीर्घ लढा द्यावा लागला आहे. ब्रिटन, अमेरिका यांसारख्या अनेक पुढारलेल्या देशांत महिलांना हा अधिकार प्राप्त करण्यासाठी शंभर-दीडशे वर्षे लढावे लागले. महाराष्ट्राची पहिली विधानसभा १९५७ ते १९६२ या कालावधीत अस्तित्वात आली. या पहिल्यावहिल्या विधानसभेच्या सभागृहात संधी मिळालेल्या एकूण महिला आमदारांची संख्या आतापर्यंतची सर्वाधिक ३० इतकी होती, तर १९९०-९५ या विधानसभेत सर्वांत कमी सहा महिला आमदार होत्या. या पहिल्या विधानसभेत पाच अपक्ष महिला आमदार होत्या. त्यानंतर १४व्‍या विधानसभेत दोन आमदारांचा अपवाद करता कुठल्याच विधानसभेत अपक्ष महिलेला संधी मिळालेली नाही. त्यानंतरच्या १४ व्या विधानसभेत दोन अपक्ष महिला आमदार राहिल्या. एकंदरीत विधानसभेत राजकीय पक्षाच्याच महिला आमदार प्रतिनिधी यांचे प्रमाण सातत्याने पाहायला मिळत आहे.
---
३६३ महिला रिंगणात
पंधराव्‍या विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. चार हजार १३६ उमेदवार या निवडणुकीत आपले भविष्य अजमावत आहेत. ज्यामध्ये ३,७७१ पुरुष उमेदवार, तर ३६३ महिला उमेदवार सहभागी आहेत.

विधानसभांतील महिलांचे बलाबल
विधानसभा : महिला
१९५७-६२ : ३०
१९६२-६७ : १७
१९६७-७२ : १२
१९७२-७८ : २८
१९७८-८० : ८
१९८०-८५ : २०
१९८५-९० : १६
१९९०-९५ : ६
१९९५-९९ : १४
१९९९-०४ : १३
२००४-०९ : १२
२००९-१४ : १३
२०१४-१९ : २२
२०१९-२४ : २७
----
महिला मतदारांची संख्या
- २०११च्या जनगणनेनुसार १००० पुरुषांमागे ९२९ महिला असे प्रमाण आहे. त्या तुलनेत २०१९मध्ये मतदार यादीतील महिलांचे प्रमाण ९२५ इतके होते. २०२४मध्ये या प्रमाणात ९३६ असे झाले आहे.
- विधानसभा निवडणूक २०२४ साठी राज्यात नऊ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये पुरुष मतदार पाच कोटी २२ हजार ७३९, महिला मतदार चार कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ इतकी झाली आहे.
--------------
महिलांची मतदान टक्केवारी
२०१४ : ६१.६९ टक्के
२०१९ : ५९. २६ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com