

रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल
विधानसभा निवडणुकीमुळे कोंडी टाळण्याचा प्रयत्न
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्र आणि मतदारसंघ कार्यालयामुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये, यासाठी रस्ते वाहतुकीत बदल केले आहेत. मतदान प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होऊ नये, तसेच मतदान केंद्रावर साहित्य वेळेत पोहोचावे यासाठी मुंबईत अनेक ठिकाणी रस्ते वाहतुकीत बदल केल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याकरिता बोरिवली पूर्व येथे रस्ते वाहतूक बदल असणार आहे. १९ नोव्हेंबरला १२ ते २४ नोव्हेंबरला ८ वाजेपर्यंत अप्पासाहेब सिधिये मार्ग, श्रीकृष्णनगर पुलापासून अभिनवनगर गेट क्रमांक ५ पर्यंत, बोरिवली पूर्व येथे वाहने उभी करण्यास मनाई आहे. तर सर्व प्रकारच्या वाहनांना २३ नोव्हेंबरला ५ ते २४ पर्यंत प्रवेशबंदी असणार आहे.
-------------------------
मतपेट्यांचे वाटप
बोरिवली विधानसभा मतदान संघ याचे कार्यालय हे रुस्तमजी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल, रूस्तम इराणी मार्ग, दहिसर पश्चिम येथे १९ नोव्हेंबरला मतपेट्यांचे वाटप वेळ सकाळी ८ ते २० वाजेपर्यंत व २० नोव्हेंबरला मतदान संपल्यावर सायंकाळी १८ ते बारा वाजेपर्यंत मतपेट्या जमा केल्या जाणार आहेत. तसेच २३ नोव्हेंबरला या ठिकाणी मतमोजणी केंद्र असल्याने सकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत मतमोजणीच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून स्ट्रॉग रूमच्या लगत असलेले मार्ग १) जयवंत सावंत मार्ग २) रुस्तमजी इराणी मार्ग हे दहिसर पश्चिम, मुंबई हे मार्ग नमूद दिवशी व वेळी या कालावधीत तात्पुरत्या स्वरूपातबंद करण्यात आलेला आहे.
---------------------------
इतर वाहनांना मनाई
विधानसभा निवडणुकीसाठी १७ नोव्हेंबर रोजी १२ ते २४ नोव्हेंबर रोजी आठ वाजे पर्यत एफसीआय, राजेंद्र नगर, बोरीवली (पूर्व), मुंबई येथे मुख्य गेटपासुन दोनशे मीटर अंतरापर्यतचे रोडवर निवडणूक कामकाजा व्यतिरीक्त इतर सर्व प्रकारची वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे.
चुनाभट्टी वाहतूक विभागात, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मधील १७४ कुर्ला विधानसभा मतदार संघाचे निवडणूक कार्यालय व स्ट्राँग रूम हे शिवसृष्टी कुर्ला कामगार म.न.पा. शाळा संकुल, एस.टी. डेपो समोर कुर्ला (पूर्व), मुंबई ४०००२४ येथे आहे.
----------------------------
साहित्याचे वाटप
१९ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रातील साहित्याचे वाटप निवडणूक कार्यालय येथे होणार असून निवडणूक साहित्य नेण्यासाठी वाहने येणार आहेत. तसेच मतदान संपल्यानंतर पुन्हा जमा होणार आहेत. तसेच २३ नोव्हेंबर रोजी मतदान मोजणी होणार आहे. वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. नो पार्किंग (निवडणुकीच्या कामकाजासंदर्भात वाहने वगळून)- १) स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान ते नेहरुनगर एस.टी डेपो शिवसृष्टी रोड पर्यंत कुर्ला (पूर्व) मुंबई २) कुर्ला कामगार नगर म.न.पा शाळा समोरील रोड, कुर्ला (पूर्व) हाआदेश. १८नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते २३ नोव्हेंबर रोजी रात्री ११:५९ वा पर्यंत लागू राहणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.