भांडुपमध्ये ठाकरे न आल्याने हिरमोड
भांडुपमध्ये ठाकरे न आल्याने हिरमोड
मीम्स, रील्स व्हायरल; उमेदवाराची कोंडी?
मुंबई, ता. १७ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी भांडुप येथील जाहीर सभेला पोहोचू न शकल्याने पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा हिरमोड झाला आहे. यामुळे ‘ठाकरेंचा भांडुपकरांवर विश्वास नाही’ अशा आशयाचे मीम्स, रील्स व्हायरल होऊ लागल्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कोरगावकर यांची कोंडी झाल्याची चर्चा सुरू आहे.
उद्धव ठाकरे हे शनिवारी चांदिवली, डोंबिवली, ठाणे येथील सभा आटोपून भांडुप येथे सभा घेणार होते. या सभेसाठी रात्री साडेनऊची वेळ दिली होती. सभास्थळी मोठी गर्दीही जमली होती. ठाकरेंना ऐकण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली; मात्र ठाकरे ठाण्यातच साडेनऊच्या आसपास पोहोचले आणि त्यांनी ध्वनिमुद्रित संदेश पाठवून भांडुपची सभा रद्द केल्याचे जाहीर करून दिलगिरी व्यक्त केली होती. ठाकरे न आल्याने कोरगावकर आणि त्यांच्या समर्थकांचा हिरमोड झाल्याची चर्चा आहे. याबाबत कोरगावकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
----
महायुती, मनसेच्या सभा, रॅली
या मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन सभा घेतल्या. मनसे नेते प्रकाश महाजन, सरचिटणीस मनोज चव्हाण, वैभव खेडेकर, महाकाल मानव सेवा समितीच्या अध्यक्षा गुरू माँ कांचन गिरी यांच्या सभा पार पडल्या. महायुती-शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार पाटील यांच्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे, अभिनेता गोविंदा यांची प्रचार यात्रा पार पडली. कोरगावकर यांच्या प्रचारार्थ नेते आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे व अन्य नेत्यांपैकी कोणीही भांडुपमध्ये फिरकलेले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

