मतदानादिवशी उकाडा वाढणार?
मतदानादिवशी
उकाडा वाढणार?
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : काही दिवसांपासून मुंबईतील कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसच्या पार गेले आहे. पुढील गुरुवारपर्यंत मुंबईतील तापमान हे कोरडे राहणार आहे. यामुळे उकाडा वाढून ऐन मतदानाच्या दिवशी मतदारांना उन्हाचे चटके बसण्याची शक्यता आहे.
दोन दिवसांपूर्वी मुंबईतील कमाल तापमान ३६.८ अंशावर गेले होते. दोन आठवड्यांपासून कमाल तापमान ३६ अंशाच्या आसपास आहे. त्यात फारसा बदल दिसलेला नाही. कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार, पुढील चार दिवस मुंबईतील वातावरण कोरडे राहणार आहे. यामुळे गरम हवा जाणवण्याची शक्यता आहे. अलीकडे ७० टक्क्यांच्या आसपास असणारे आर्द्रतेचे प्रमाणदेखील वाढण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (ता. २०) मतदान होत आहे. या दिवशीही तापमान चढे राहण्याची शक्यता असल्याने मतदारांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागू शकतात. यामुळे सकाळच्या सत्रात मतदान करून मोकळे झाल्यास हा त्रास वाचणार आहे.
कुलाबा वेधशाळेने पुढील २४ तासांसाठी वर्तवलेल्या अंदाजानुसार शहर आणि उपनगरांत आकाश मुख्यतः निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३६ अंश सेल्सिअस आणि २४ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

