निर्भयपणे करा मतदान
मुंबई, ता. १९ ः राज्यातील २८८ मतदारसंघांमध्ये आज मतदान होणार आहे. मतदानाचा हक्क निर्भयपणे बजावावा म्हणून राज्यभरात प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून एकट्या मुंबईत ३० हजार पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
राज्यातील एक लाख १८६ केंद्रांवर आज मतदान होणार आहे. बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून मुंबईत पाच अतिरिक्त आयुक्त, २० उपायुक्त, ८३ सहाय्यक आयुक्त, दोन हजार अधिकारी, २५ हजार अंमलदार, तीन दंगल नियंत्रण पथके तैनात केली जाणार आहेत. पोलिसांच्या जोडीला वाहतूक विभागातील दीडशे अधिकारी, एक हजार अंमलदार, सुमारे चार हजार गृहरक्षक दलाचे जवान आणि निवडणूक आयोगाने नेमलेली स्थिर सर्वेक्षण आणि भरारी पथके तैनात करण्यात येणार आहेत.
----
९९० मतदान केंद्रे संवेदनशील
विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी राज्यातील २८८ मतदारसंघांमधील एक लाख १८६ केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यातील ९९० केंद्रे क्रिटिकल अर्थात संवेदनशील ठरवण्यात आली आहेत. या केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी, यासाठी राज्य पोलिसांसह केंद्रीय राखीव पोलिस बलाच्या तुकड्या तैनात केल्या जाणार असल्याची माहिती पोलिस मुख्यालयातून सांगण्यात आले.
----
६५५ कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीसाठी आचारसंहिता काळात प्रतिबंधात्मक कारवाईदरम्यान राज्यात तब्बल ६५५.५३ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यात १५३ कोटींच्या रोख रकमेचा समावेश आहे. त्यासोबत ६८.६३ कोटींचा अवैध दारूसाठा, ७२ कोटींचे अमली पदार्थ, २८२.४९ कोटींचे मौल्यवान धातू, ३.७८ कोटी रुपये मूल्य असलेल्या भेटवस्तू जप्त केल्या. तर, गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि प्रवृत्ती असलेल्या सुमारे ८० हजार व्यक्तींवर भारतीय न्याय संहितेतील कलमांनुसार प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचे मुख्यालयाने स्पष्ट केले.
----
५९,६५६ शस्त्रे जप्त
राज्यात एकूण ७८,२६७ शस्त्र परवाने जारी आहेत. आचारसंहिता काळात यापैकी ५६,६०४ परवानाधारक शस्त्रे जमा करण्यात आली. २३५ परवानाधारक शस्त्रे हस्तगत करण्यात आली. तब्बल २,२०६ अवैध शस्त्रे जप्त करण्यात आली. ६११ शस्त्रांचा परवाना रद्द करण्यात आला.
-----
२२,१९३ तक्रारी
सी-व्हिजिल ॲप आणि एनजीएसपी पोर्टलवर आचारसंहिता भंगाच्या एकूण २२,१९३ तक्रारी प्राप्त झाल्या असून १७,४८५ तक्रारी निकाली काढल्या.
----
दृष्टिक्षेपात निवडणूक...
मतदारसंघ - २८८
उमेदवार - ४,१३६
मतदार - ९,७०,२५,११९
मतदान केंद्रे - १०,०१८६
संवेदनशील केंद्रे - ९९०
बॅलेट युनिट - १,६४,९९६
कंट्रोल युनिट - १,१९,४३०
व्हीव्हीपॅट - १,२८,५३१
---
राज्यात पंधराव्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मुंबईतील प्रत्येक मतदाराने हक्क, अधिकार आणि कर्तव्य शांततेत पार पाडावे.
- विवेक फणसाळकर, मुंबई पोलिस आयुक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

