बोटावरील शाई दाखवा...सवलत मिळवा

बोटावरील शाई दाखवा...सवलत मिळवा

Published on

मुंबई, ता. १९ : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रातून मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. निवडणूक आयोगाने मतदानाचा टक्का वाढवा, यासाठी विविध उपाययोजना केल्या असताना आता दुकानदार आणि हॅाटेल संघटनांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर बोटावरील शाई दाखवणाऱ्यांना २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान खरेदी, खानपान, तसेच मनोरंजनाच्या ठिकाणी १० ते २० टक्के सवलत दिली जाणार आहे.
देशाची लोकशाही अबाधित रहावी, तसेच नागरिकांनी बहुसंख्येने मतदान करावे, निवडणूक आयोगाकडून विविध स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. मुंबई महानगरात यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये मतदानाचे प्रमाण राज्यातील इतर भागांच्या तुलनेत कमी होते. मुंबई महानगरांतील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी यंदा विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्याकरिता महापालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केले जात आहेत. वेगवेगळ्या व्यावसायिक संघटना, संस्था, समूह हेदेखील मतदान जनजागृती उपक्रमांमध्ये आपापल्या पद्धतीने हातभार लावत आहेत. महाराष्ट्र रिटेलर्स असोसिएशन, व्यावसायिकांची संघटना, उपाहारगृह, चित्रपटगृह व्यावसायिकांची संघटनांसह इतरही अनेक खासगी उद्योग समूह, व्यावसायिक आस्थापनांनी ग्राहकांसाठी सवलती जाहीर केल्या आहेत.
------------------------------------------------------
नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (एनआरएआय) मुंबई विभागाने मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘डेमॉक्रसी डिस्काउंट’ हा विशेष उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमात २० आणि २१ नोव्हेंबर रोजी मुंबईतील सहभागी रेस्टॉरंट्समध्ये जेवणाच्या एकूण बिलावर २० टक्के सूट दिली गेली आहे. तरुण शहरी मतदारांना मतदान प्रक्रियेतील सहभागासाठी प्रेरित करणे, हा या मागचा उद्देश आहे.
- रॅचेल गोएंका, प्रमुख, नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया, मुंबई विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com