दंडाधिकाऱ्यांची गुगलला नोटीस

दंडाधिकाऱ्यांची 
गुगलला नोटीस
Published on

दंडाधिकाऱ्यांची
गुगलला नोटीस
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही प्राणी कल्याणासाठी काम करणारी ध्यान फाउंडेशन ही संस्था आणि एका आध्यात्मिक व्यक्तीविरोधात यू ट्युबवर पोस्ट केलेला बदनामीकारक, अश्‍लील व्हिडिओ न हटवल्याबद्दल बेलार्ड इस्टेट दंडाधिकाऱ्यांनी गुगलला नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर याप्रकरणी कोणतीच कारवाई न केल्याने स्थानिक पोलिसांनाही नोटीस बजावली असून सुनावणी ३ जानेवारीपर्यंत तहकूब केली.

ध्यान फाउंडेशनने म्हटले आहे की, एका अनोळखी व्यक्तीने त्यांची संस्था आणि आध्यात्मिक व्यक्ती योगी अश्विनी यांच्याविरोधात बदनामीकारक यू ट्युब व्हिडिओची लिंक प्रसारित केली होती. सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध करण्यात आला. त्यामुळे संस्थेची आणि योगी अश्विनी यांची प्रतिमा डागाळल्याने दंडाधिकारी न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली. अवमान याचिकेत संस्थेने म्हटले आहे की, मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या याचिका ग्राह्य धरून ३१ मार्च २०२४ रोजी यू ट्युबला आक्षेपार्ह मजकूर हटवण्याचे निर्देश दिले होते. तरीसुद्धा भारताबाहेर हा व्हिडिओ अजूनही यू ट्युबवर दिसत आहे आणि प्रत्येकजण तो पाहू शकतो, असे अर्जदारांचे म्हणणे आहे. संस्थेने दाखल केलेल्या अवमान याचिकेची दखल घेऊन अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी (बेलार्ड इस्टेट) ए. यू. बहीर यांनी गुगलला नोटीस बजावली. तसेच, व्हिडिओ काढण्यासाठी कोणतीही कारवाई न केल्याचा ठपका ठेवून स्थानिक पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनाही नोटीस बजावली आहे. या प्रकरणावरील सुनावणी ३ जानेवारीपर्यंत तहकूब केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com