दिव्यांग मुलांसाठी ‘प्रथम’चे जनजागृती अभियान सुरू

दिव्यांग मुलांसाठी ‘प्रथम’चे जनजागृती अभियान सुरू
Published on

दिव्यांग मुलांसाठी ‘प्रथम’चे जनजागृती अभियान सुरू

मुंबई, ता. ३ : समाजातील दिव्यांग मुले आणि व्यक्तींबद्दल सर्वसामन्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे, त्यांचे आरोग्य, कल्याणकारी सेवा आणि योजनांना प्रोत्साहन देणे यासाठी प्रथम मुंबई शिक्षण उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. हे अभियान १० डिसेंबर या मानवाधिकार दिनापर्यंत चालणार असल्याची माहिती प्रथम मुंबई शिक्षण उपक्रमाचे कार्यक्रमप्रमुख नवनाथ कांबळे यांनी दिली.
या अभियानाचा उद्देश आणि दिव्यांग मुले आणि व्यक्तींच्या हक्कांसाठी समाजात तसेच शासन पातळीवर जनजागृती करून प्रयत्न करणे हा आहे. हे अभियान कुर्ला, घाटकोपर, शिवाजीनगर, धारावी, बोरिवली आणि कांदिवली येथील प्रथमच्या सहा दिव्यांग थेरपी केंद्रांमध्ये तसेच मुंबईभर वस्तीपातळीवर राबवले जाईल. ही थेरपी केंद्रे मुंबई महापालिका शिक्षण विभाग आणि समग्र शिक्षा अभियानाच्या सहकार्याने कार्यरत करण्यात आली आहेत. या केंद्रांद्वारे दिव्यांग मुलांसाठी थेरपीची सेवा तसेच सर्वसमावेशक सेवा पुरवल्या जातात, त्यांच्या कुटुंबीयांना प्रोत्साहन दिले जाते आणि समाजात जनजागृती केली जाते. या अभियानामध्ये मुलांच्या ॲक्युपेशनल थेरपी आणि फिजिओथेरपीच्या गरजांसाठी तपासण्या करणाऱ्या आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. याशिवाय त्यांच्या पालकांसाठी मानसिक आरोग्य कार्यशाळा घेतल्या जातील, अशी माहितीही कांबळे यांनी दिली. या अभियानादरम्यान अंगणवाडी शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण सत्रांचे आयोजन केले जाईल. जनजागृतीसाठी पोस्टर लावण्याची मोहीम राबवली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com