शिवकुमार गौतमसह आठ जणांना पोलिस कोठडी

शिवकुमार गौतमसह आठ जणांना पोलिस कोठडी
Published on

शिवकुमार गौतमसह आठ जणांना पोलिस कोठडी
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण :१८ जणांना न्यायालयीन कोठडी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : माजी राज्य मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रबंधक (मोक्का) कायद्याअंतर्गत अटक केलेल्या आठ आरोपींना सत्र न्यायालयाने मंगळवारी (ता.३) पोलिस कोठडी सुनावली. मुख्य हल्लेखोर शिवकुमार गौतम याचा त्यात समावेश असून ७ डिसेंबरपर्यंत न्यायालयाने आरोपींना पोलिस कोठडी सुनावली आहे. तर इतर १८ आरोपींना न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

निर्मल नगर परिसरात १२ ऑक्टोबर रोजी सिद्दीकी यांच्यावर सहा गोळ्या झाडण्यात आल्या. त्या पैकी दोन त्यांना लागल्या. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले, उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर पोलिसांनी घटना स्थळावरून दोन हल्लेखोरांना अटक केली. त्यांच्या चौकशीतून बिष्णोई टोळीच्या संपर्कात असलेला गुन्हेगार शुभम लोणकर आणि या कटात सहभागी असलेल्या इतर आरोपींबाबतची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्या आधारे पुणे, अकोला, उत्तरप्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब येथून आरोपींची धरपकड करण्यात आली. सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडणारा शूटर शिवकुमार गौतम याला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली. एकूण २६ आरोपींना अटक करण्यात आली असून कुख्यात लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल, शुभम लोणकर आणि जिशान अख्तर या तीन फरार आरोपींचा शोध सुरू आहे. मकोका अंतर्गत अटक करण्यात आलेल्या या आरोपीना आज सत्र न्यायालयात हजर करण्यात आले, त्यावेळी न्यायालयाने आठ जणांना पोलिस कोठडी व इतर आरोपींना न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com