विधानभवन परिसरात 
‘पे अॅण्ड पार्क’ बंद

विधानभवन परिसरात ‘पे अॅण्ड पार्क’ बंद

Published on

विधानभवन परिसरात
‘पे ॲण्ड पार्क’ बंद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता ७ : नवनिर्वाचित राज्य सरकारचे आजपासून विशेष अधिवेशन सुरू झाले आहे. त्यामुळे विधानभवनात येणाऱ्या आमदारांच्या वाहनांना जागा अपुरी पडू लागल्याचे सांगत या परिसरातील पे ॲण्ड पार्क सुविधा बंद करून इतर वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे. या विशेष अधिवेशनाच्या कालावधीत हा बदल लागू राहणार आहे, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

विशेष अधिवेशन ९ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधी विधानभवन परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक आणि वाहनांची गर्दी होणार आहे. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी पे ॲण्ड पार्क’ सुविधा बंद केल्याचे सांगण्यात आले. जमनालाल बजाज मार्ग (उषा मेहता चौक ते जमनालाल बजाज मार्ग डेड एन्ड), विनय के. शहा मार्ग (जमनालाल बजाज मार्ग जंक्शन ते मुरली देवरा चौक), दोराबजी टाटा रोड (मुरली देवरा चौक ते गेंडा पॉइंट), रामनाथ गोएंका मार्ग (साखर भवन जंक्शन ते विधानभवन मार्ग), विधानभवन मार्ग आवश्यकता भासल्यास (युनियन बँक बिल्डिंग ते मादाम कामा रोड) येथील पे ॲण्ड पार्क बंद करण्यात आला आहे. तसेच व्ही. व्ही. राव मार्ग, फ्री प्रेस जनरल मार्गावर आमदारांच्या वाहनांसाठी पार्किंग उपलब्ध करून इतर वाहनांना येथे ७ ते ९ डिसेंबरपर्यंत वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे.
-----------------
हा रस्ता बंद राहणार
विधानभवन मार्ग युनियन बँक बिल्डिंग ते मादाम कामा रोडपर्यंत तर रामनाथ गोएंका मार्गावर गरज भासल्यास साखर भवन जंक्शन ते विधानभवन मार्गापर्यंत ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत रस्ता बंद करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com