मुंबई, धनबाद येथे बॉम्बस्फोटांची धमकी

मुंबई, धनबाद येथे बॉम्बस्फोटांची धमकी

Published on

मुंबई, ता. ७ ः धनबाद, मुंबई येथे बॉम्बस्फोट तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठार मारण्याची धमकी वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइनवर शुक्रवारी मध्यरात्री दिली गेली होती. याप्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून सायबर विभागातर्फे संदेश धाडणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यरात्री दोनच्या सुमारास संदेशातून काही व्यक्तींची नावे आणि मोबाईल क्रमांक देण्यात आले आहेत. या व्यक्ती पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटना आयएसआयसाठी काम करत असून भारतीय लष्कराला नुकसान पोहोचवण्यासाठी धनबाद आणि मुंबई येथे बॉम्बस्फोट घडवणार आहेत. तसेच, पंतप्रधान मोदींची हत्या करणार असल्याचा कट रचल्याचे नमूद केले होते. वाहतूक पोलिसांनी तातडीने ही बाब मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवली असून पुढील कारवाई सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com