

सुनील पाल यांचे
मेरठ येथे अपहरण?
तपासासाठी गुन्हा मेरठ पोलिसांकडे वर्ग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : हास्यकलाकार सुनील पाल यांनी २ डिसेंबरला मेरठ येथे अनोळखी व्यक्तींनी अपहरण करून २० लाखांची खंडणी मागितल्याचा दावा केला. याप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी अपहरण, खंडणीचा गुन्हा नोंदवून तो मेरठ पोलिसांकडे पुढील तपासासाठी वर्ग केल्याचे सांगण्यात आले.
पाल हे २ डिसेंबरला हरिद्वार येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. आयोजकांनी काही रक्कम त्यांना आगाऊ दिली होती. प्रवासादरम्यान मेरठ येथे एका ढाब्यावर नाश्त्यासाठी थांबलेल्या पाल यांचे काही व्यक्तींनी अपहरण केले. त्यांना निर्जनस्थळी आणून २० लाख रुपयांची खंडणी मागितली. इतके पैसे नसल्याचे सांगणाऱ्या पाल यांना पैशांची व्यवस्था करण्यासाठी मोबाइल फोन वापरण्याची मुभा दिली. त्यांनी साडेसात लाख रुपयांची व्यवस्था केली. त्यातील २० हजार रुपये हाती ठेवून अपहरणकर्त्यांनी त्यांची सुटका केली. ४ डिसेंबरला ते मुंबईत आपल्या घरी परतले, असा दावा त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात केला आहे.
दरम्यान, त्यांच्या पत्नीने सांताक्रूझ पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. त्याबाबत पोलिसांनी त्यांचा शुक्रवारी जबाब नोंदवला. तेव्हा त्यांनी हा प्रसंग पोलिसांना सांगितला. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून तो मेरठ पोलिसांकडे वर्ग केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.