पाच वर्षांत ‘बेस्ट’ डबघाईला

पाच वर्षांत ‘बेस्ट’ डबघाईला

Published on

पाच वर्षांत ‘बेस्ट’ डबघाईला
२,१६० बस स्क्रॅपमध्ये; फक्त ३७ नवीन बसची खरेदी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : बेस्ट प्रशासनाने गेल्या पाच वर्षांत २,१६० जुन्या बस भंगारात काढल्या; परंतु त्याऐवजी फक्त ३७ नवीन बस खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. ‘बेस्ट’चा स्वमालकीचा बसचा ताफा कमी होऊन हजारांवर आला तर कंत्राटी वाहनांचा ताफा वाढला.

आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत ही माहिती मागविली होती. मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२४ पर्यंत केवळ १,०६१ बेस्ट बस कार्यान्वित होत्या. गेल्या तीन महिन्यांत त्यात आणखी घट होऊन ही संख्या १,००३ पर्यंत खाली आली आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता ही परिस्थिती चिंताजनक आहे. दुसरीकडे कंत्राटी बसची संख्या १,९०० इतकी वाढली आहे. दरम्यान, बेस्टने २,१२६ बस भाड्याने घेण्याचा निर्णय घेतल्यमुळे वाद निर्माण झाला होता.
मुंबईसह उपनगरांमध्ये सेवा देणाऱ्या बेस्टच्या कंत्राटी पद्धतीवर तज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच बेस्ट थांब्यावर प्रवाशांच्या रांगा लागत आहेत. काही मार्गांवर अतिगर्दीमुळे प्रवाशांना बसमध्ये चढताही येत नाही. त्यातच काही प्रवासी दरवाजाला लटकून आपला जीव धोक्यात घालून बेस्टने प्रवास करीत आहेत. बेस्टत्या अपुऱ्या सेवेचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसला आहे. परिणामी प्रवाशांना टॅक्सी, रिक्षा, ओला, उबरचा आधार घ्यावा लागत आहेत. लाखो मुंबईकर प्रवाशांसाठी, विशेषतः कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी बेस्ट ही जीवनवाहिनी आहे. बेस्ट उपक्रम, जो कधी काळी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा होता. आता तो गैरव्यवस्थापन आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संकटात सापडला आहे. त्यातच आता बेस्टला स्वत:चे अस्तिव टिकवण्यासाठी झगडावे लागत आहे.


यंग व्हिसलब्लोवर्स फाउंडेशनचे कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी बेस्टप्रकरणी सरकारवर सामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. सार्वजनिक वाहतुकीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी सरकारने सुमारे १३,००० कोटी खर्चाच्या कोस्टल रोडसारख्या मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना प्राधान्य दिले आहे. यामुळे सामान्य मुंबईकरांना किफायतशीर आणि दर्जेदार वाहतूकसेवेपासून वंचित राहावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.


..
बेस्टचे अनेक अपघात योग्य प्रशिक्षण नसलेल्या बसचालकांमुळे होत आहेत. कंत्राटी कामगार बहुतेक वेळा दबावाखाली काम करतात. अशा घटना कमी करण्यासाठी, कौशल्यपूर्ण आणि योग्य प्रशिक्षित चालकांना स्थिर नोकरीसह कायमस्वरूपी नियुक्त करणे आवश्यक आहे. यामुळे अपघाताच्या प्रमाणात घट होईल.
- जितेंद्र घाडगे, यंग व्हिसलब्लोवर्स फाउंडेशन
...................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com