बेस्ट बसखाली वृद्ध चिरडला
बेस्ट बसखाली
वृद्ध चिरडला
मुंबई, ता. ११ ः कुर्ला येथील बेस्ट अपघाताची घटना ताजी असतानाच, दुचाकीच्या धडकेत रस्त्यावर पडलेल्या वृद्धाला बेस्ट बस चिरडल्याची घटना बुधवारी (ता. ११) संध्याकाळी साडेचार वाजता सीएसएमटी स्थानकानजीक घडली. या अपघातात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, गोरेगाव येथेही सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास बेस्ट बसचा किरकोळ अपघात झाला.
अणुशक्तीनगरहून इलेक्ट्रिक हाऊसकडे जाणारी बेस्ट बस सीएसएमटीनजीक आली होती. तत्पूर्वी एका दुचाकीस्वाराने धडक दिल्याने एका वृद्ध पादचारी रस्त्यावर पडला. त्याचवेळी मागून येणाऱ्या बेस्ट बसच्या खाली येऊन काही अंतर फरफटत गेला. बसचालक ज्ञानदेव जगदाळे आणि वाहक नंदकिशोर लंबखाडे यांच्या ही बाब लक्षात येताच त्याने लगेच बस थांबवली; पण तोपर्यंत वृद्धाचा मृत्यू झाला होता. सदर व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात सुरू असून बेस्ट चालकाकडे चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

