मविआ नेते वेगळी भूमिका घेऊ शकतात : प्रवीण दरेकर

मविआ नेते वेगळी भूमिका घेऊ शकतात : प्रवीण दरेकर

Published on

मविआ नेते वेगळी भूमिका घेऊ शकतात : प्रवीण दरेकर
मुंबई, ता. ११ : स्वत:चे राजकीय भविष्य, कार्यकर्त्यांचा आग्रह आणि मतदारसंघाचा विकास याबाबत विवंचना असेल तर यासाठी महाविकास आघाडीचे किंवा शरद पवार यांच्या गटाचे खासदार, आमदार वेगळी भूमिका घेऊ शकतात, अशा सूचक शब्दांत भाजपचे विधानपरिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी त्यांना भाजपमध्ये येण्याचे आमंत्रण दिले आहे.

भाजपकडून आता राज्यात पुन्हा ‘मिशन लोटस’ राबवले जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. विरोधकांना पूर्णपणे संपविण्यासाठी पुन्हा हा प्रयोग केला जाईल, अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजप गटनेते दरेकर यांनी हे सूचक आमंत्रण दिले आहे. लाडकी बहीण योजनेवर दरेकर म्हणाले की, शासनाच्या कुठल्याही योजनेत काही दोष असतील, घाईगडबडीत चुका झाल्या असतील तर दुरुस्त करणे ही शासनाची जबाबदारी असते. लाडकी बहीण योजनेतील सदोष खात्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी जाहीरच केले होते की, ही योजना पारदर्शकपणे सुस्थितीत आणण्याची गरज आहे. तेच येथे होत आहे. लाडक्या बहिणींवर अन्याय होणार नाही. योजना अखंड चालू राहील, बहिणींना २,१०० रुपये देण्याचे आमच्या वचननाम्यात आश्वासन होते, तेही निश्चितपणे पूर्ण केले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com