तांत्रिक नव्हे तर मानवी दोषामुळे अपघात
तांत्रिक नव्हे तर मानवी दोषामुळे अपघात
कुर्ला अपघातप्रकरणी परिवहन विभागाचा प्राथमिक अहवाल
नितीन जगताप : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : कुर्ला पश्चिमेतील एस. जी. बर्वे मार्गावरील अंजुमन इस्लाम हायस्कूलसमोर सोमवारी (ता. ९) रात्री बेस्ट बस पादचारी आणि वाहनांना चिरडून एका कमानीवर आदळली. या अपघातात सात जण ठार, तर ४२ जण जखमी झाले होते. यामध्ये बसचा ताशी वेग कि.मी. ५० होता, ५० सेकंद आणि चालकाचा गोंधळ अन् ४९ जणांना या बसची धडक बसली. यामध्ये यांत्रिक नव्हे तर मानवी दोषामुळे अपघात झाल्याचे परिवहन विभागाच्या प्राथमिक अहवालात सांगण्यात आले आहे.
आरोपी बसचालक संजय मोरे याला क्लच आणि गिअरची अवजड वाहने चालविण्याचा अनुभव होता. अपघात झाला त्यावेळी त्याने क्लच समजून चुकून ॲक्सिलेटरवर पाय दिल्यामुळे बस थांबण्याऐवजी तिचा वेग वाढल्याचे सांगण्यात येत आहे. परिवहन विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, कोणताही अपघात झाल्यास तीन शक्यता पाहणे महत्त्वाचे आहे. यामध्ये रस्ता रचना, यांत्रिक दोष आणि मानवी दोषचा समावेश आहे. यापैकी रस्ता चांगला आहे, गाडी तपासणीत चांगली आढळली आहे. त्यामुळे मानवी दोष असल्याची शक्यता जास्त आहे. गाडीचा वेग ताशी प्रती कि.मी. ३५ असू शकतो. गाडी जास्त वेगात असल्याचे दिसत नाही. तसेच, जर गाडीचा वेग ताशी प्रती कि.मी. २० असता तरीही हा अपघात घडू शकला असता. बस धोकादायकरीत्या ३०० मीटर का केली हे महत्त्वाचे आहे. आता ब्रेक बरोबर असतील तर ते तेव्हाही बरोबर असणार आहेत. ती घटना घडली तेव्हा चालकाचा भीतीने गोंधळ उडाला असेल. त्यामुळे बसवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले नसेल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
==
कुर्ला येथे झालेल्या रस्ते अपघातात बेस्ट बसने २२ गाड्यांना धडक दिली आहे. पहिल्या गाडीला धडक दिल्यानंतर बस थांबवली नाही. त्यामुळे घटनेच्या वेळी चालकाची मनस्थिती कशी होती, याची कारणमीमांसा झाल्याशिवाय अपघात कसा झाला हे समजू शकणार नाही. त्यामुळे चालकाची वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे.
- प्रकाश जाधव, निवृत्त अधिकारी, परिवहन विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

