बेस्ट बसचालकांकडून दारू खरेदी

बेस्ट बसचालकांकडून दारू खरेदी

Published on

बेस्ट बसचालकांकडून दारू खरेदी
कुर्ला अपघातानंतर अनेक व्हिडीओ व्हायरल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. त्यानंतर कंत्राटी बसचालकांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले; परंतु तरीही या अपघातानंतर काही कंत्राटी बसचालकांकडून कर्तव्यावर असताना दारू खरेदी केली जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाले आहे. या प्रकरणात मुलुंड बस आगारातील एका चालकाला निलंबित करण्यात आले आहे.
मुलुंड आगारातील बेस्ट बसचा चालक दारूची बाटली घेऊन प्रवास करत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर समोर आला आहे. आगारातील सुरक्षा रक्षकाने बस आगारात आल्यानंतर तिची तपासणी करत असताना हा प्रकार समोर आला. त्यात बसचालक संतोष बारस्कर याने दारू प्यायल्याचे कबूल केले; मात्र दारूची बाटली आपली नसल्याचे म्हटले आहे. सदर घटना २० नोव्हेंबर रोजी घडल्याचे बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले. या प्रकरणी चालक बारस्कर यास निलंबित करण्यात आले आहे.
याशिवाय व्हायरल झालेल्या दुसऱ्या व्हिडीओत वांद्रे पूर्व परिसरात ११ डिसेंबर रोजी रात्री १०.३० वाजता बसचालक भररस्त्यात बस थांबवतो. त्यानंतर चालक वाइन शॉपमध्ये जाऊन दारूची बाटली विकत घेऊन आला. बसचालक बस घेऊन निघणार, तितक्यात स्थानिक समाजसेवकांनी त्यास रोखण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी बेस्ट प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे.
............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com