आरबीआयला रशियन भाषेत धमकीचा ईमेल
आरबीआयला रशियन भाषेत धमकीचा ई-मेल
मुंबई : रिझर्व्ह बँकेला ई-मेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरोधात माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी गुरुवारी (ता. १२) गुन्हा नोंदवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बँकेच्या अधिकृत ई-मेल आयडीवर रशियन भाषेतील धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. बँक प्रतिनिधीने याबाबत पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले. पुढे एमआरए मार्ग पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. धमकी रशियन भाषेत असली तरी ई-मेल कोणी, कुठून पाठवला याचा तपास पोलिस सायबर विभागाच्या मदतीने करणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

