मुंबई विद्यापीठात प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिसचा सुकाळ

मुंबई विद्यापीठात प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिसचा सुकाळ

Published on

मुंबई विद्यापीठात प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिसचा सुकाळ
पदाच्या नियुक्तीला विद्या परिषदेत मान्यता; दुहेरी पदवीलाही मंजुरी

मुंबई, ता. १३ : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या प्रभावी अंमलबजावणीच्या धर्तीवर, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बहुविद्याशाखीय शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध संधीचे दालन खुले करण्यासाठी मुंबई विद्यापीठात आता दुहेरी पदवी, सहपदवी आणि ट्विनिंग पदवीच्या शिक्षणासाठी विद्या परिषदेने शुक्रवारी मंजुरी दिली. त्यासोबतच प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिसच्या पदांच्या नियुक्तीस मान्यता दिल्याने विद्यापीठाच्या अनेक विभागांत आणि संलग्न असलेल्या महाविद्यालयात प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिसच्या नावाने सुकाळ होणार आहे.

दुहेरी पदवीच्या शिक्षणाअंतर्गत आता विद्यार्थ्यांला दोन महाविद्यालये किंवा दोन उच्च शिक्षण संस्थांमध्ये एकत्र प्रवेश घेता येईल, हा शिक्षणक्रम पूर्ण केल्यावर दोन पदव्या मिळतील. दुहेरी पदवीच्या शिक्षणक्रमाअंतर्गत दोन्ही पदव्या डिस्टन्स, ऑनलाइन पद्धतीने किंवा एका प्रत्यक्ष आणि एका डिस्टन्स पद्धतीने दिली जाऊ शकते. याव्यतिरिक्त, या तरतुदीअंतर्गत दोन्ही पदव्या आता प्रत्यक्ष मोडमध्ये एकाच वेळी घेतल्या जाऊ शकतील; परंतु यासाठी सहभागी महाविद्यालयांनी विद्यापीठाची रीतसर अनुमती घेऊन व शैक्षणिक सामंजस्य करार करणे गरजेचे राहील. या बहुविद्याशाखीय शिक्षणक्रमांना प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क आणि आनुषंगिक बाबींची माहिती ही सुरुवातीलाच कळविली जावी, असेही यावेळी कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिसच्या पदांच्या नियुक्तीस मान्यता
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिसच्या पदांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाने गठित केलेल्या समितीच्या शिफारशीनुसार विद्यापीठात प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिसच्या पदांच्या नियुक्तीस विद्यापरिषदेने मान्यता दिली आहे. समितीच्या शिफारशीनुसार हे पद भरताना उद्योन्मुख क्षेत्रातील गरजा लक्षात घेऊन तसेच विद्यापीठ विभागांनी उद्योग जगतातील आवश्यक गरजा आणि क्षेत्र ओळखून हे पद भरण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच, एआयसीटीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे अवलंबन आणि धोरणाचे वार्षिक पुनरावलोकन करण्यात यावे, अशीही शिफारस समितीने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com