पॉस मशीन बंद पडल्याने 
राज्यात धान्यपुरवठा ठप्प!

पॉस मशीन बंद पडल्याने राज्यात धान्यपुरवठा ठप्प!

Published on

पॉस मशीन बंद पडल्याने
राज्यात धान्यपुरवठा ठप्प!
अनेक गावांमध्ये नागरिकांची गैरसोय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : राज्यातील विविध शहरातील स्वस्त धान्य विक्री दुकानात पॉस मशीन बंद पडल्याने धान्यवितरण ठप्प झाले आहे. त्यामुळे अन्नधान्य मिळत नसल्याने ग्राहक, तर धान्य वितरण करता येत नसल्याने विक्रेत्यांची गैरसोय होत आहे.
रेशन दुकानातील पीएसओ मशीन बंद असल्यामुळे नागरिकांना धान्य मिळणे दुरपास्त झाले आहे. तक्रार करूनही तोडगा निघत नसल्याने नागरिक मेटाकुटीला आले असून आता काय खायचे, असा प्रश्न ते विचारत आहेत. नागपुरात रेशन दुकानातील पीओएस मशीन बंद असल्याने ग्राहकांना धान्य मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे ग्राहक व दुकानदार त्रस्त झाले आहेत. दुकानदाराकडे धान्याचा स्टॉक असूनही त्याचे वितरण करता येत नसल्याने दुकानात आलेल्या ग्राहकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. तर, ग्राहकांची गैरसोय पाहता धान्य ऑफलाइन पद्धतीने वितरण करा, अशा सूचना दुकानदारांना देण्यात आल्या आहेत; मात्र दुकानदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून ऑफलाइन पद्धतीने धान्य वितरण केल्यास त्याचा रेकॉर्ड कसा ठेवायचा, असा प्रश्न त्यांना पडत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com