९.६ कोटींचे सोने जप्त
९.६ कोटींचे सोने जप्त
मुंबई : महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) शुक्रवारी (ता. १३) मुंबईच्या एअर कार्गो संकुलातून परदेशातून तस्करी करून आणलेले सुमारे १२ किलो सोने हस्तगत केले. या साठ्याची किंमत ९.६ कोटी रुपये आहे. हे सोने डीजे लाइटमध्ये दडवून आणण्यात आले होते. डीआरआय पथकाने डीजे लाइट मागणाऱ्या कंपनीच्या गोदामावर छापा घातला. तेव्हा तेथे सोने तस्करीच्या उद्देशाने तयार करण्यात आलेले ६८ डीजे लाइट आढळले. याप्रकरणी दोन व्यक्तींना अटक करण्यात आली असून याप्रकारे कोट्यवधी रुपयांच्या सोन्याची तस्करी करण्यात आली असावी, असा संशय पथकाने व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

