डॉक्टरने लगवाली टेक्निशियनच्या कानशिलात!

डॉक्टरने लगवाली टेक्निशियनच्या कानशिलात!

Published on

डॉक्टरने लगावली टेक्निशियनच्या कानशिलात!
केईएम रुग्णालयातील प्रकार; कामगार संघटनांचे आंदोलन

मुंबई, ता. १३ : केईएम रुग्णालयातील एक्स रे विभागातील टेक्निशियनसोबत बाचाबाची करत प्रथम वर्षाच्या डाॅक्टरने टेक्निशियनच्या कानशिलात लगावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर कर्मचाऱ्यांकडून शुक्रवारी (ता. १३) दुपारी आंदोलन करण्यात आले. संबंधित डाॅक्टरला तीन दिवस निलंबित करण्यात आले असून भविष्यात डाॅक्टरांकडून असे प्रकार घडणार नसल्याचे आश्वासन प्रशासनाकडून उपअधिष्ठाता डाॅ. हरिष पाठक यांनी कर्मचाऱ्यांना दिले.

केईएम रुग्णालयात शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ऑर्थोपेडिक्स विभागातील प्रथम वर्षाचे डॉ. निखिल वाडेकर एका रुग्णाला एक्स रे काढण्यासाठी तिसऱ्या मजल्यावर घेऊन आले होते. त्यावेळी एक्स रे विभागात ऑनड्युटी असलेले टेक्निशियन दीपक जाधव यांनी रुग्णाच्या केसपेपर असलेल्या नोंदी अपूर्ण असून त्या पूर्ण करा, असे डॉ. वाडेकर यांना सांगितले. याचा राग आल्याने डाॅ. वाडेकर यांनी जाधव यांना धक्काबुक्की करत कानशिलात लगावली. जाधव हे अपंग असल्याने त्यांना मारहाण करू नका, असे इतर कर्मचारी आणि प्रत्यक्षदर्शी सांगत होते; पण वाडेकर यांनी मारहाण केल्याचे सांगितले. या घटनेच्या निषेधार्थ केईएम येथील तीन कामगार संघटनांनी आंदोलन सुरू केले; मात्र तत्काळ प्रशासनाबरोबर बैठक घेण्यात आल्यामुळे रुग्णालयाच्या कामकाजात व्यत्यय आला नाही.

..
तीन दिवसांसाठी निलंबन
डाॅ. निखिल वाडेकर यांच्या आरोपांचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि प्रकरणाची सविस्तर चौकशी प्रलंबित असताना महापालिका सेवा व शिस्त अधिनियम आणि नियमांनुसार प्राथमिक शिस्तभंगाची कारवाई म्हणून तत्काळ प्रभावाने तीन दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. या निलंबनाच्या कालावधीत, रुग्णालयाच्या आवारात जाण्यापासून, क्लिनिकल कर्तव्यावर उपस्थित राहण्यापासून किंवा हॉस्पिटलचे कर्मचारी किंवा रुग्णांशी संवाद साधण्यापासून परावृत्त करण्यात आल्याचे पत्र केईएम रुग्णालयातील शैक्षणिक अधिष्ठाता डाॅ. हरिष पाठक यांनी दिले.
......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com