पूर्व उपनगरातील आरोग्य सेवा ढेपाळली

पूर्व उपनगरातील आरोग्य सेवा ढेपाळली
Published on

पूर्व उपनगरातील आरोग्यसेवा ढेपाळली
पुरेशा सुविधा नसल्‍याने रुग्‍णांची गैरसोय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ ः ईशान्य मुंबईतील रुग्णालयांमध्ये पुरेशा सुविधा नाहीत, कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने रुग्णाने त्यांच्या नातेवाइकांचे प्रचंड हाल होत आहेत. आरोग्यसेवा ढेपाळली आहे. त्यामुळे रुग्णालयांची व्यवस्था सुधारण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
मुलुंडच्या अगरवाल रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे काम चालू करण्यात आले होते. ते अद्याप पूर्ण झालेले नाही. राजावाडी रुग्णालयाची अवस्था वाईट आहे. कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. कर्मचाऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण दिले जात नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. चेंबूर, पांजरापोळ येथील शताब्दी रुग्णालयात ईसीजी काढण्यासाठी तंत्रज्ञ नाहीत.
पालिका रुग्णालयाची दयनीय अवस्था असून, त्याकडे पालिका प्रशासनाचे लक्ष नसल्याचा आरोप होत आहे. गंभीर आजाराच्या रुग्णांना सायन रुग्णालय, केईएम रुग्णालय किंवा नायर रुग्णालयाकडे पाठविले जाते. पूर्व उपनगरातील सर्व रुग्णांलयांमध्ये रुग्‍णांची प्रचंड हेळसांड होत आहे. ईशान्य मुंबईतील रुग्णालयांच्या वाईट अवस्थेबद्दल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार संजय दिना पाटील यांनी हा मुद्दा प्रामुख्याने मांडला होता, मात्र याबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. गरीब रुग्णाच्या आरोग्याबाबत प्रशासनाची उदासीनता दिसून आल्याचे त्यांनी सांगितले.
शताब्दी रुग्णालयात ईसीजी तंत्रज्ञाऐवजी सफाई कामगार महिला रुग्णांचे ईसीजी काढत असल्याचे आढळून आले आहे. प्रशासनाचा हा नाकर्तेपणा असून, ‘लाडकी बहीण योजने’ सह चांगल्या सोयी-सुविधा द्या, त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या, अशी मागणी खासदार संजय दिना पाटील यांनी केली आहे.

पूर्व उपनगरातील पालिकेच्या रुग्णालयातील आरोग्यसेवा ढेपाळली आहे. रुगणांचे हाल होत असताना प्रशासनाने आरोग्य व्यवस्था सुधारावी. पूर्व उपनगरातील सर्व रुग्णालये अद्ययावत करावीत.
- संजय पाटील, खासदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com