राज्यस्तरीय कला प्रदर्शनात कोकण सरस

राज्यस्तरीय कला प्रदर्शनात कोकण सरस
Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनात कोकणातील सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट सावर्डे महाविद्यालयाच्या शिल्पकला विभागातून विशाल गोवळकरला राज्यातून प्रथम पुरस्कार मिळाला आहे, तर विशाल मसणे यांना गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले आहे.
मुंबई कला संचालनालयाच्या वतीने नागपूर येथे ६४वी महाराष्ट्र राज्यस्तरीय कलाप्रदर्शनी होणार आहे. यानिमित्ताने चित्रशिल्प स्पर्धा भरवण्यात आली आहे. या प्रदर्शनात एखाद्या कलाकृतीची निवड होणे, ही मोठी बाब समजली जाते. त्यामुळे महाराष्ट्रातील कला महाविद्यालये या प्रदर्शनात सहभागी होतात. या प्रदर्शनीत सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट सावर्डे महाविद्यालयातील २५ विद्यार्थ्यांच्या ३० कलाकृतींची निवड झाली आहे.
---------------------------------------
निवड झालेले विद्यार्थी
मूलभूत अभ्यासक्रम - मिथिल अंगचेकर, विराज पाचाडकर, ज्योती पांचाळ, साहिल परुळेकर, आदित्य सावरटकर, अभिषेक जावळे.
कलाशिक्षक पदविका प्रथम वर्ष - तन्वी गोरीवले, धनंजय नलावडे, ऋतिक इनामदार, सोनल घाणेकर.
कलाशिक्षक पदविका द्वितीय वर्ष - प्रतीक गांजेकर, स्वरूप पवार.
रेखा व रंगकला विभाग - तुळशी भुवड, सुजल निवाते, शुभम घोरपडे.
शिल्प व प्रतिमानबंध कला - प्रथमेश गोंधळी, सार्थक आदवडे, भूषण थवी, चैतन्य मांडवकर, रुचित सांगळे, विशाल गोवळकर, ऋषिकेश पड्याळ, सोहम धामणस्कर, अध्वज चव्हाण, विशाल मसणे.
--------------------------------
पाण्याच्या शोधात असणाऱ्या वन्यप्राण्यांच्या डोक्यात विविध प्रकारची भांडी अडकल्याचे अनेक छायाचित्रांत आणि चित्रफितींत पाहिले आहे. याच संकल्पनेचा आधार घेऊन प्राण्यांबाबत घडणाऱ्या घटनांचे वास्तव शिल्पाकृतीतून दाखविण्याचा प्रयत्न केला.
- विशाल गोवळकर, युवा कलाकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com