

प्रदूषणाचा धोका कायम
घाटकोपर, शिवाजीनगर परिरात हवेची वाईट स्थिती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई ,ता. ७ : मुंबईत वाढलेला हवेच्या प्रदूषणाचा स्तर अद्याप कायम आहे. आज (ता. ७) घाटकोपर आणि शिवाजीनगरमध्ये हवेचा स्तर वाईट नोंदवला गेला. महापालिकेने धूळ नियंत्रणासाठी सुरू केलेले प्रयत्न अपुरे पडत असल्याचे समोर आले आहे.
मुंबईतील बऱ्याच परिसरतील हवेचा स्तर आजही खलावलेलाच आहे. घाटकोपर आणि शिवाजीनगरमध्ये अनुक्रमे २८१ आणि २७३ हवा गुणवत्ता निर्देशांकासह हवेचा स्तर ऑरेंज ॲलर्टसह ‘वाईट’ नोंदवला गेला. गेल्या दोन महिन्यांपासून येथील हवेचा स्तर सुधारलेला नाही.
मुंबईतील अन्य परिसरातही हवेचा स्तर सुधारलेला नसल्याचेच दिसत आहे. बीकेसी, भायखळा, शिवडी, सायन, वरळी येथेदेखील प्रदूषण कायम असल्याचे दिसते. या सर्व परिसरातील हवा गुणवत्ता निर्देशांक हा १०० च्या वर कायम आहे. शिवडी १८६ , बीकेसी १६६, भायखळा १२४, सायन १४२, वरळी १४५ हवा गुणवत्ता निर्देशांकासह येथे हवेचा स्तर मध्यम नोंदवला आहे. या परिसरात हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
संपूर्ण मुंबईचा विचार केल्यास दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांतही हवेचा स्तर खालावलेला आहे. हवेचा स्तर सुधारण्यासाठी पालिकेने विविध उपाययोजना राबवल्या. बांधकामांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या. रस्ते धुणे, हवेत पाण्याची फवारणी करणे अशा उपाययोजनाही केल्या. इतकेच नाही तर काही बांधकामांना काम थांबवण्याच्या नोटिसा बजावत काम थांबवले. मुंबईकरांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे.
महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी स्वतः विविध परिसरांना भेट देत प्रदूषण वाढीची कारणे जाणून घेत तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनीदेखील महापालिकेसोबत संयुक्त बैठक घेत प्रदूषण नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू केले. शिवाजी पार्कचीही त्यांनी पाहणी करून तेथील धूळ नियंत्रणात आणण्यासाठी १५ दिवसांत ठोस पावले उचलण्याच्या सूचना केल्या.
परिसर एक्यूआय
घाटकोपर - २८१
शिवाजीनगर - २७३
शिवडी - १८६
बीकेसी - १६६
मालाड प. - १५०
वरळी - १४५
सीएसटी - १४७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.