माती भरणीच्या कामामुळे शिवडीत प्रदूषण

माती भरणीच्या कामामुळे शिवडीत  प्रदूषण
Published on

माती भरणीच्या कामामुळे शिवडीत प्रदूषण
मुंबईतील सर्वाधिक प्रदूषण हे शिवडी भागामध्ये होत आहे. येथे सुरू असलेला मातीचा थराव यासाठी कारणीभूत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे स्थानिक माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी केला आहे. प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी महापालिकेने बोरिवली व भायखळा येथे बांधकामांवर तात्पुरती बंदी आणली. अशाच प्रकारची कारवाई शिवडीमध्ये करावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही पडवळ यांनी दिला आहे. शिवडी पूर्व, हाजी बंदर येथील मोदी स्टोन या कंपनीत दोन महिन्यांपासून दरदिवशी अंदाजे ५०० पेक्षा जास्त डंपर इतक्या मातीची भरणी केली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे ही माती बीकेसी येथून वाहून आणली जात आहे. त्‍यामुळे फॉर्सबेरी रोड व हाजी बंदर रोड संपूर्ण धुळीने माखलेले आहेत. पडवळ यांनी महापालिका आयुक्त तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे रीतसर तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे. हा परिसर दाट लोकवस्तीचा असून येथे सुमारे २,००० घरे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com