सशस्त्र लुटमार करणारे अटकेत

सशस्त्र लुटमार करणारे अटकेत
Published on

मुंबई, ता. ७ ः पी. डिमेलो मार्गावर गोळीबार करत सशस्त्र लूटमार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आरोपींकडून लुटीतील १६.५० लाखांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला असून, अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
सराफा व्यवसायासोबत अंगडीया सेवा पुरवणारे चिराग धंदुकीया सोमवारी रात्री ४७ लाखांचे दागिने गोव्याला पोच करण्यासाठी कोकण रेल्वेने प्रवास करणार होते. काळबादेवी येथील कार्यालयातून रात्री दहाच्या सुमारास त्यांच्यासोबत त्यांचा पुतण्या आणि अन्य एक व्यक्ती दुचाकीवर होता. पी. डिमेलो मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक १८ जवळील प्रवेशद्वारावर दागिन्यांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न झाला, पण दुचाकीवर मागे बसलेल्या चिरागच्या पुतण्याने प्रतिकार केल्यामुळे आरोपींनी दोन गोळ्या झाडत बॅग हिसकावून पळ काढला होता. या प्रकरणात पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे, सहाय्यक आयुक्त तन्वीर शेख, वरिष्ठ निरीक्षक संतोष धनवटे यांनी तातडीने पोलिस पथके नेमली होती. सीसीटीव्ही चित्रणाआधारे ओळख पटलेल्या दोघांना काळबादेवी परिसरातून अटक करण्यात आली.
------------------------------------------------------------
आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी
किरण धनावडे, अरुण मढीया ऊर्फ घाची अशी आरोपींची नावे असून, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. या दोघांनी त्यांच्या अन्य साथीदारांसोबत काळबादेवी येथूनच चिरागचा पाठलाग सुरू केल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com